नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख व जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या विषयी सामाजीक प्रतीमा मलीन करणारी पोस्ट टाकून खोटी विधाने सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नंदूरबार नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात अखेर अखेर अभिनेत्री केतकी चितळे व एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
13 मे रोजी अभिनेत्री केतकी चितळे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे पक्षप्रमुख व जेष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या विषयी सामाजीक प्रतीमा मलीन करणारी पोस्ट टाकु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष प्रमुख यांचा घोर अपघाम करून त्यांची सामाजीक प्रतिमा मलीन करणारे खोटी विधाने ॲड नितीन भावे यांनी केले व सदर विधान केतकी चितळे यांनी समर्थन दर्शवून शरदचंद्रजी पवार यांची अब्रुस नुकसान होईल हे माहिती असतांना देखील सोशल मिडीयाद्वारे शेअर करून अब्रुचे नुकसान केले म्हणून राष्ट्रवादीचे नंदूरबार शहर अध्यक्ष नितीन जगताप यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात केतकी चितळे व ॲड. नितीन भावे यांच्या विरुद्ध भादवी कलम 500,501,505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोउनि माधुरी कंखरे करीत आहेत.