नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरात कुठलेही पदवी नसताना क्लिनिक चालविणाऱ्या झारखंड राज्यातील एका बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळील शक्ती क्लिनीकमध्ये
वैदयकीय क्षेत्रात कोणतेही मान्यताप्राप्त कागदपत्र नसतांना डॉक्टर असल्याचे बनाव करत स्वत : चे नावे शक्ती क्लिनीक असे नावाचे क्लिनीक सुरू करून त्यात ॲलोपॅथी औषध साठा सह लोकांचे तपासणी व औषध उपचार करतांना दिसून आला म्हणून नंदूरबार तालुका आरोग्य अधिकारी डॉ . जाफर रशिद तडवी यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात प्रदिप तपन विश्वास रा . मु . पो . मराफरी सिंबादीन बोकारो, राज्य झारखंड याच्या विरुद्ध महा . वैदयकीय अधि . १९ ६१ मधील कलम ३३,३३ ( अ ) ३४ . ३६ सह फुड व ड्रग कायदा चे कलम १८A १८AI १८VI व १८ C सह महा . औषधी प्रसाधन १ ९ ४० व नियम १८४५ चे सेक्शन SCH – K & २२ ( CCA ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोह जगदीश पवार करीत आहेत.