नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील दऱ्या खोऱ्यात वसलेल्या आदिवासी बांधवाचा विकास साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील मोठ्या आणि दुरवच्या ग्रामपंचयातींचे विभाजन करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली होती. अक्राणी येथे विधानसभा प्रचारावेळी आले असतांनाच शिवसैनिकांनी जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचे विभागाज का आवश्यक असल्याची माहीती शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनासा आणुन दिली होती असे शिवेसना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, याच अनुशंगाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन जिल्ह्यात नव्याने अनेक ग्रामपंचायतींची निर्मीती झाली आहे. या ग्रामपंचायत विभाजणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्न केल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या वतीने या नेत्यांचे विशेष आभार देखील मानत आहोत.
नंदुरबार मध्य विभाजनानंतर मांडवी बु या मोठ्या ग्रामपंचायतींचे विभाजन करुन याठिकाणी नव्याने 8 ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. यात 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तर तोरणमाळ ग्रामपंचायतीचे विभाजन करुन या ठिकाणी देखील नव्याने आठ ग्रामपंचायती निर्माण करण्यात आल्या आहेत. तोरणमाळ मधल्या या आठ ग्रामपंचायतीमध्ये 10 गाव समाविष्ट असणार आहेत. तर तिकडे भुषा ग्रामपंचायतीचे विभाजन करुन याठिकाणी नव्याने तीन ग्रामपंचायतींची निर्मीती करण्यात आली आहे. या तीन ग्रामपंचायतींमध्ये 9 गावांचा समावेश असणार आहे. तर धडगाव मधल्या चिचकाठी ग्रामपंचायतीचे विभाजन करुन चिचकाठी आणि चांदसैली अशा दोन ग्रामपंचायती निर्माण करण्यात आल्या आहेत. तर राजबर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन करुन नव्याने 7 ग्रामपंचायतींची निर्मीती करण्यात आली आहे. यात सात ग्रामपंचायतीमध्ये 10 गावांचा समावेश असणार आहे. अशा पद्धतीने आता धडगाव नव्याने 27 ग्रामपंचायतींची निर्मीती झाली आहे. तर नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे ग्रामपंचायतीचे देखील विभाजन होवुन आता घुली आणि राकसवाडे अशा दोन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत.
या सर्व ग्रामपंचायत विभाजनासाठी शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी 3 ते 4 महिने सातत्याने पाठपुरावा केला , यासर्व ग्राम पंचायती विभाजन प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, कृषी सभापती गणेश पराडके, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पराडके यांनी मुख्यमंत्री सह साऱ्या मंत्र्यांचे आभार मानले आहे .नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतीचे मुख्यालय गावातच अथवा नजीकच्या गावात असल्याने अनेक दाखले, महत्वांच्या कामांसाठी दऱया खोऱयातल्या आदिवासी मानसांना मदत होणार असुन अतिदुर्गम भागाचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी ग्रामपंचयात विभाजनाचा हा महत्वपुर्ण निर्णय मैलाचा दगड ठरेल असा विश्वास शिवेसना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.