नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील जगतापवाडी चौफुली ते गिरीकुंज सोसायटीपर्यंत नालीचे काम तात्काळ करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन जगताप यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील गिरीकुंज सोसायटी समोरील जगतापवाडी चौफुली येथील पाईप लाईन करण्याबाबत वारंवार तोंडी सांगून व लेखी निवेदन देवून नालीचे काम झालेले नाही . काम पास झाले आहे , असे वारंवार सांगितले जाते , तरीही काम होत नाही . बायपास रस्त्याने ते पाणी जगतापवाडी परिसरात वाहत आहे . त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे . त्यामुळे येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आहे . तरी येत्या दहा दिवसाच्या आत ते काम पूर्ण करावे , अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मोठे आंदोलन उभे केले जाईल व त्या दिवशी होणाऱ्या परिणामास नंदुरबार नगरपालिका जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नितीन जगताप, शहर उपाध्याय राजा ठाकरे, शहर कोषाध्यक्ष सुनिल राजपुत, शहर समन्वयक विठ्ठल जाधव, पवन राजपुत, रुपेश जगताप आदी उपस्थित होते.