नवापुर l प्रतिनिधी
युरोपातील 18 हजार 510 फूट उंच असलेलं सर्वोच्च शिखर सर करणारे नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या बालाघाट या गावातील आदिवासी कुटुंबातील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी नवापुर येथे येऊन नवापुर भाजपा तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य भरत गावित यांची भेट घेतली, यावेळी अनिल वसावे यांचे छायाचित्र असलेल्या टी-शर्ट चे भरत गावित यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
तसेच अनिल वसावे यांना भविष्यातील मोठं मोठी शिखर सर करण्याच्या शुभेच्छा दिल्या व आर्थिक 50 हजार अर्थ सहाय्य भरत गावित यांनी केले, यावेळी धनराट ग्रा.पं. सरपंच दिनकर गावीत, धुडीपाडा ग्रा.पं उपसरपंच लाजरस गावीत, सामाजिक कार्यकर्ते विनेश गावीत, किरण गावीत , सुनिल गावीत सह कार्यकर्ते उपस्थित होते.








