Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आयान साखर कारखान्याचे गाळप बंद होणार सिनगारे : शेतकर्‍यांनी ऊस आणून द्यावा

team by team
May 3, 2022
in कृषी
0
आयान साखर कारखान्याचे गाळप बंद होणार सिनगारे : शेतकर्‍यांनी ऊस आणून द्यावा

नंदुरबार l प्रतिनिधी
समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याचे गाळप मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बंद करण्यात येणार आहे. तत्पूर्वी शेतकर्‍यांनी आपला ऊस तोड करून कारखान्यास द्यावा असे आवाहन संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे.
याबाबत श्री.सिनगारे यांनी सांगितले, कारखान्याचा २०२१-२२ चा चालू गळीत हंगाम मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बंद करण्यात येणार आहे. कारखान्याने आतापर्यंत ११ लाख ३७ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले. यासाठी ऊस तोडणी व वाहतूक कारखान्याच्या यंत्रणेमार्फत करण्यात आली. कारखाना सुरू ठेवण्याची कारखाना व्यवस्थापनाची प्रबळ इच्छा आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे ऊस तोडणी मजूर संख्या घटली आहे. पर्यायाने आवश्यक ती ऊस तोडणी व ऊस पुरवठा होत नाही. कारखान्याच्या ऊस तोडणी व वाहतूक नियंत्रण अभावी ऊस गाळपास पाठवण्यास ऊस उत्पादकांना अडचणी निर्माण होत आहेत. ऊस उत्पादकांना ऊस तोड करण्यास अडचण निर्माण होत असल्यास ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील कलम ३(३) अन्वये कारखान्याच्या उपविधी नुसार स्वतः ऊस तोडणी करून वाहतूक करून कारखाना गेटवर कारखाना बंद होण्यापूर्वी पोहोच करावा. अन्यथा असा कोणताही ऊस गाळपाविना शिल्लक राहिल्यास त्यास कारखाना जबाबदार राहणार नाही. याची कार्यक्षेत्रातील आणि कार्य क्षेत्राबाहेरील उत्पादकांनी नोंद घ्यावी व आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन श्री.सिनगारे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कामगार दिनानिमित्त युवारंग फाऊंडेशनतर्फे नंदुरबारातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

Next Post

राज्यसेवा पूर्व परीक्षा : सामान्य अध्ययन पेपर क्र. २ अर्हताकारी करण्याचा निर्णय

Next Post
राज्यसेवा पूर्व परीक्षा : सामान्य अध्ययन पेपर क्र. २ अर्हताकारी करण्याचा निर्णय

राज्यसेवा पूर्व परीक्षा : सामान्य अध्ययन पेपर क्र. २ अर्हताकारी करण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add