Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कामगार दिनानिमित्त युवारंग फाऊंडेशनतर्फे नंदुरबारातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

team by team
May 3, 2022
in सामाजिक
0
कामगार दिनानिमित्त युवारंग फाऊंडेशनतर्फे नंदुरबारातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

नंदुरबार l प्रतिनिधी
१ मे महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त येथील युवा फाऊंडेशनतर्फे तहसिल कार्यालय सभागृहात नंदुरबार शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून तहसिलदार भाऊसाहेब थोरात हे होते. तर प्रमुख अतिथी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे हे होते. तसेच नंदुरबार शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष किशोर कांतीलाल देसाई, उपाध्यक्ष नासीर खान समद खान, सचिव राजेश शिवाजी काशिद, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेता क्ष्मण मुरलीधर वाणी, म.रा.वृत्तपत्र विक्रेता संघटना कार्यकारी सदस्य तसेच नंदुरबार शहर वृत्तपत्र संघटनेचे सल्लागार उमेशचंद्र रमणलाल वाणी उपस्थित होते. यावेळी युवारंग फाउंडेशनतर्फे मान्यवरांच्या हस्ते एकुण ४२ पेपर विक्रेत्यांचा सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. तहसिलदार भाऊसाहेब थोरात म्हणाले की, तुम्ही टाकलेला पेपर आम्ही वाचतो, पण तो पेपर आमच्यापर्यंत पोहोचविण्यामागे तुमचा चेहरा आहे व आज त्या चेहर्‍यांचा युवारंग फाउंडेशच्या माध्यमातून झालेला सन्मान खुपच स्तुत्य आहे. जेष्ठ पेपर विक्रेता उमेशचंद्र वाणी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पेपर टाकत आहोत, पण आजपर्यंत आमचा सन्मान कोणी केला नाही. युवारंग फाउंडेशनने आज आमचा सन्मान केला, त्याबद्दल आम्ही सदैव त्यांचे ऋणी राहू. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल शिंदे यांनी केले तर प्रस्तावना जितेंद्र लुळे यांनी मांडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवारंग फाऊंडेशनचे उपाध्यक्ष देवेंद्र कासार, प्रणव पवार, ऋषिकेश मंडलिक, भावेश मंडलिक, हर्षल मिस्तरी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत 388 प्रकरणे मंजूर,62 प्रकरणे नामंजूर, बँकेचे खाते आधार लिंक कार्डशी लिंक करण्याचे आवाहन

Next Post

आयान साखर कारखान्याचे गाळप बंद होणार सिनगारे : शेतकर्‍यांनी ऊस आणून द्यावा

Next Post
आयान साखर कारखान्याचे गाळप बंद होणार सिनगारे : शेतकर्‍यांनी ऊस आणून द्यावा

आयान साखर कारखान्याचे गाळप बंद होणार सिनगारे : शेतकर्‍यांनी ऊस आणून द्यावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add