Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महावितरणाच्या सबस्टेशनमधील ट्रान्स्फार्मर केबलला लागली अचानक आग

team by team
April 30, 2022
in क्राईम
0
महावितरणाच्या सबस्टेशनमधील ट्रान्स्फार्मर केबलला लागली अचानक आग

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा शहरात असलेल्या महावितरणाच्या सबस्टेशनमधील ट्रान्स्फार्मर केबलला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.या लागलेल्या आगीत सब स्टेशनमधिल केबल जळून खाक झाल्याची घटना घडली, दरम्यान कर्मचारी व परिसरात असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयात बसलेले पदाधिकारी व तरुणाच्या प्रसंगावधानाने अग्निशमन दलाला तात्काळ प्राचरण केल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कमी-अधिक दाबाचा वीजपुरवठा झाल्यामुळे केबलवर ताण आल्याने शॉर्टसर्किट होऊन आगीच्या ठिणग्या पडल्या व त्यातून ही आग लागली असल्याचा अंदाज वीज वितरण कंपनी अभियंत्याने सांगितले.आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर आग विझवण्यासाठी कार्यालयात व सब स्टेशनमध्ये उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तसेच शेजारील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात उपस्थित असणारे बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश मराठे, राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप परदेशी,राहुल पाडवी, मुकेश पाडवी,सोनू सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष कमलेश पाडवी, बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, धर्मराज पवार यांच्यासह लाईंम्यान पाडवी, गुलाब पवार, यजे गिरनार व सर्व स्टाप पाचपाण्डे साहय्यक अभियंता यांनी तत्काळ हजर होवून आग विझवण्याचे प्रयत्न केले.
भर दुपारी ही आग लागल्याने वायरी शेजारी असणारा पालापाचोळा ने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली असतांना काही क्षणात याठिकाणी अग्निशमन दलाची गाडी त्या ठिकाणी दाखल झाली व काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळवणे शक्‍य झाले या आगीने रौद्र रूप धारण केले असते तर संपूर्ण सबस्टेशन मध्ये आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु सर्वांनी तत्परता दाखवल्यामुळे सुदैवाने मोठ्या प्रमाणावर होणारी वित्त आणि व जीवित आणि टळली. उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील यांनी तत्काळ घटना्थळी धाव घेवून परिस्थिती जाऊन घेतली व आज विझवण्यासाठी सहकार्य करणाऱ्याचे आभार मानले. आज तात्काळ आटोक्यात आली नसती तर मोठे नुकसान झाले असते.
या आगीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामागे सबस्टेशनच्या आवारातील ट्रान्सफरवरील सर्व केबल वायर जळून पूर्णपणे खाक झाल्या.त्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा एक तास बंद होता. तासाभरानंतर केबल बदलून शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र,ग्रामीण भागातील वीजपुरवठा आग लागण्यानंतर संध्याकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता.रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती वीज वितरण कंपनीचे तळोदा कक्षाचे सहाय्यक अभियंता तिरुपती पाटील यांनी दिली. या आगीत केबलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते ३० महिला बचत गटानां 35 लाखांचे कर्ज मंजुरीचे पत्र वाटप, 660 जणांचा काढला विमा

Next Post

पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी न करून ठाकरे सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेची लूट : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची घणाघाती टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add