Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील नागरीकांनी निवेदन सादर करावीत राज्य मागास प्रवर्ग आरक्षण समर्पित आयोगाची सूचना

team by team
April 28, 2022
in राजकीय
0
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील नागरीकांनी निवेदन सादर करावीत राज्य मागास प्रवर्ग आरक्षण समर्पित आयोगाची सूचना

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरीकांच्या मागासप्रवर्गास आरक्षण मिळणेकामी गठीत केलेल्या समर्पित आयोगासमोर निवेदनात्मक माहिती सादर करण्यासंदर्भात  आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी तत्सम नागरीक, संस्था, सेवाभावी संस्था, संघटना तसेच नोंदणीकृत राजकीय पक्षांनी निवेदन सादर करावीत, असे आवाहन भटके हक्क परिषद व अ.भा.महात्मा फुले समता परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाचा ग्रामविकास विभागाने दि.११ मार्च २०२२ रोजीच्या अधिसुचनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग गठीत केलेला आहे. सदर आयोग दिलेल्या कार्यकक्षेप्रमाणे, स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालिन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्याच्या अनुषंगाने ओबीसी समुहातील कुणबी, कुंभार, माळी, गुरव, तेली, तांबोळी, सोनार, शिंपी, न्हावी, धोबी, सुतार, लोहार, कासार, भावसार, गुजर, जव्हेरी, कलाल, मन्यार, मोमीन, पिंजारा, मुजावर आदींसह तत्सम ३४६ जाती व्हीजेएनटीमधील धनगर, वंजारी, बंजारा, भोई, गोसावी, गवळी, जोशी-गोंधळी, चित्रकथी, कंजर, बेलदार, लोहार, वडार, वैदू, गोपाळ, ओतारी, सिकलकर, छप्परबंदशाह आदींसह तत्सम संपूर्ण ५३ जाती तसेच एसबीसीतील कोळी, साळी, कोष्टीक, भंगी, मेहतर आदींसह तत्सम ७ जातीतील नागरीकांकडून, संस्थांकडून, सेवाभावी संस्थांकडून, संघटनांकडून व नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून अभिवेदन/सूचना मागवित आहेत. अभिवेदन/सूचना लेखी स्वरुपात dcbccmh@gmail.com किंवा +९१२२२४०६२२१ किंवा कक्ष क्र.११५, पहिला माळा, ए-१ इमारत, वडाळा, टर्मिनल, वडाळा आरटीओ जवळ, वडाळा, मुंबई-४०००३७ या पत्त्यावर दि.१० मे २०२२ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन भटके विमुक्त हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष व अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष इंजि.रामकृष्ण मोरे व कार्याध्यक्ष एजाज बागवान यांनी केले आहे. निवेदनाची नमुनाप्रत ओमसाई झेरॉक्स (९८३४००२७२९) एलआयसी ऑफीस जवळ, नाट्य मंदिर समोर, नंदुरबार येथे उपलब्ध होईल.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील सुरेश गावीत व पुंजू भोये यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर 2 मे रोजी नाशिक येथे होणार सन्मान

Next Post

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी वीजबिल भरणा केंद्रे सुरू

Next Post
ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी वीजबिल भरणा केंद्रे सुरू

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी वीजबिल भरणा केंद्रे सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add