Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोगस बियाणे विक्रीच्या प्रतिबंधासाठी 7 भरारी पथके, कार्यान्वित कृषि विभागाची माहिती

team by team
April 21, 2022
in कृषी
0
बोगस बियाणे विक्रीच्या प्रतिबंधासाठी 7 भरारी पथके, कार्यान्वित कृषि विभागाची माहिती

नंदुरबार l प्रतिनिधी
बोगस बियाणे विक्रीला आळा घालण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात सात भरारी पथक गठित करण्यात आली आहेत.अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी दिली आहे.
खरीप हंगाम जवळ येत असून येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बीयाणे, खते व इतर कृषि निविष्ठा वेळेत उपलब्ध व्हावीत म्हणून कृषी विभागाने नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हास्तरावर 1 तर तालुकास्तरावर प्रत्येकी 1 प्रमाणे 6 अशी एकूण 7 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी हे भरारी पथकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पथकात उप विभागीय कृषि अधिकारी, मोहिम अधिकारी, निरीक्षक वजनमापे हे सदस्य तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा गुणवत्ता अधिकारी नियंत्रण निरीक्षकाचा समावेश या पथकात असणार आहे.तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी हे पथक प्रमुख म्हणून काम पाहतील तर निरीक्षक वजनमापे, मंडळ कृषि अधिकारी,कृषि अधिकारी हे सदस्यन असतील.
बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी या पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकामार्फत कृषि सेवा केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे. तसेच अनाधिकृतरित्या व्रिकी होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीला प्रतिबंध बसणार आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्याची खरेदी करावी, बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक पडताळून पाहावे. पेरणी झाल्यावर बियाणे पाकिट पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे, शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्याची खरेदी करु नये, कीटकनाशके, तण नाशकांची खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. खत विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खतांची खरेदी करु नये. जादा दराने कृषि निविष्ठाची विक्री करत असल्यास त्याबाबत जिल्हास्तरीय किंवा तालुका कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी.असे आवाहनही कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा येथील दोनशे वर्षे पुरातन कै.सद्गुरु तोतराम महाराज मंदिरास लागली आग, 2 तासानंतर आग आटोक्यात

Next Post

ॲपेरिक्षाची मोटारसायकलला जोरात धडक, पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू ,पत्नी व मुलगा जखमी

Next Post
ॲपेरिक्षाची मोटारसायकलला जोरात धडक, पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू ,पत्नी व मुलगा जखमी

ॲपेरिक्षाची मोटारसायकलला जोरात धडक, पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू ,पत्नी व मुलगा जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add