Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा येथील दोनशे वर्षे पुरातन कै.सद्गुरु तोतराम महाराज मंदिरास लागली आग, 2 तासानंतर आग आटोक्यात

team by team
April 21, 2022
in क्राईम
0
प्रकाशा येथील दोनशे वर्षे पुरातन कै.सद्गुरु तोतराम महाराज मंदिरास लागली आग, 2 तासानंतर आग आटोक्यात

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील दोनशे वर्षे पुरातन कै.सद्गुरु तोतराम महाराज मंदिरास आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. शहादा व नंदुरबार येथील अग्निशमन बंबाच्या प्रयत्ना नंतर 2 तासानंतर आग आटोक्यात आली.दरम्यान यात मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रतिकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथील कै. सद्गुरू तोताराम महाराज दोनशे वर्षे पुरातन मंदिरास आज सकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या दरम्यान मंदिराच्या वरील बाजूस मंदिराचे पुजारी दिक्षित वास्तव्य करीत असलेल्या भागास अचानक आग लागल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती,प्रकाशा गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या तोताराम महाराज मंदिराच्यावरील भागात आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत सदर मंदिराचे पुजारी हे वरील भागात राहत असल्याने त्यांना मंदिराच्या आपण वास्तव्य करीत असलेल्या वरच्या भागात काहीतरी जळत असल्याचे भास होतात त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना याची माहिती देताच नागरिकसह प्रकाशा सरपंच, उपसरपंच भरत पटेल घटनास्थळी दाखल झाले.काही वेळातच याआगीने मोठे रुद्ररूप धारण केले होत.मोठ्या प्रमाणात आग पसरून मोठे नुकसान झाले आग ही सकाळी जवळपास एक ते दोन तास धुमसत राहिले आगीची माहिती तात्काळ शहादा येथील अग्निशामक दलाला देण्यात येऊन तेथून अग्निशमन बंब तात्काळ पाचारण करण्यात येऊन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले तसेच शहादा अग्निशमन येथील बंबा समवेतच नंदुरबार येथून देखील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमनबंबला पाचारण करण्यात आले होते सुमारे दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आली असून मंदिराचा वरचा भाग व खालचा काही भाग या आगीत जळून खाक झाल्याने मंदिराचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे, एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात मंदिरास आग लागण्याची ही पहिलीच घटना घडली आहे याबाबत शहादा महसूल प्रशासनाकडून सदर घटनेची सखोल चौकशी करत पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू आहे.तर सदर आगीच्या घटनेत मंदिराचा बराचसा भाग संपुर्णपने जळून खाक झाला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.समता चौधरी ठरल्या “महाराष्ट्र ग्लॅमरस ब्युटी मेडीक्वीन”

Next Post

बोगस बियाणे विक्रीच्या प्रतिबंधासाठी 7 भरारी पथके, कार्यान्वित कृषि विभागाची माहिती

Next Post
बोगस बियाणे विक्रीच्या प्रतिबंधासाठी 7 भरारी पथके, कार्यान्वित कृषि विभागाची माहिती

बोगस बियाणे विक्रीच्या प्रतिबंधासाठी 7 भरारी पथके, कार्यान्वित कृषि विभागाची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add