म्हसावद l प्रतिनिधी
प्रदेशाध्यक्षा सौ. उमाताई खापरे यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नंदुरबार यांच्यातर्फे पोषण आहार अभियान कार्यक्रमांतर्गत डोंगरगाव ता. शहादा येथील अंगणवाडीमध्ये भा.ज.पा.महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ.सौ.किन्नरी सोनार व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने अंगणवाडी बालकांना फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस जितु जमदाडे. जिल्हा उपाध्यक्ष नंदा सोनवणे. जिल्हा सचिव संगीता पाठक.शहराध्यक्ष विनोद जैन शहर.युवा मोर्चा शहराध्यक्ष राजीव देसाई सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाठक सुपरवायझर तिरूमले मॅडम ,बालवाडी शिक्षिका , सेविका व विद्यार्थी उपस्थित होते.