Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निर्वस्त्र अवस्थेत डाकीण ठरवून दिले चटके, डाकीण पीडित महिलेचा अंनिस ने लावला शोध

team by team
April 18, 2022
in क्राईम
0
निर्वस्त्र अवस्थेत डाकीण ठरवून दिले चटके, डाकीण पीडित महिलेचा अंनिस ने लावला शोध

नंदूरबार l प्रतिनिधी
गेले आठवडाभर निर्वस्त्र अवस्थेत डाकीण ठरवून छळ झालेल्या महिलेचा व्हायरल झालेला व्हिडिओ चे सत्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने उघडकीस आणले आहे. सदर महिला महाराष्ट्राच्या सीमेलगत पानसेमल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या बायगोर गावातली आहे.गावातील काही लोकांनी तिला डाकीण ठरवून अंगावर चटके देण्याची शिक्षा दिली होती. सदर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. सदर महिला तीस वर्षाची विवाहित तरुणी असून गेले बारा वर्ष मनोरुग्ण अवस्थेत गावातच हिंडत आहे. नग्नावस्थेत चटक्यांची शिक्षा देऊन ही सदर प्रकरण गावातच जातपंचायतीने मिटवण्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकाने सदर गावाचा शोध लावून प्रत्यक्ष महिलेची भेट घेतली. महिला आणि तिचे कुटुंब अत्यंत दरिद्री अवस्थेत जगत असून, म्हातारे आई वडील व लहान भाऊ असा छोटा परिवार आहे. मजुरी करून जीवन जगणार्‍या या कुटुंबात सदर महिला बारा वर्षापासून मनोरुग्ण या अवस्थेत आहे .अंधश्रद्धांच्या पायी कुटुंबाने सदर महिलेला अनेक बुवा-बाबा मांत्रिक यांच्याकडे फिरवत उपचार करण्याचा प्रयत्न केला .काही हजार रुपये खर्च करूनही उपचार न झाल्याने सदर महिला आजही मनोरुग्ण अवस्थेत आहे .महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कुटुंबाला भेट देऊन सदर कुटुंबाला आधार दिला आणि मानसिक उपचारासाठी मदतीची ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. सदर तक्रार मध्यप्रदेश प्रशासनापर्यंत पोहोचून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत संघटना प्रयत्न करणार आहे. तेथील प्रशासनाच्या सहकार्याने डाकीण प्रथा विरोधी प्रबोधनाचे मोहीम सुरू करण्याबाबत प्रस्ताव देणार आहे .या पथकामध्ये महाराष्ट्र आणि अक्कलकुवा शाखा कार्याध्यक्ष सुमित्रा वसावे, शहादा कार्यकर्ते के आर पाडवी, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील आणि राज्य सरचिटणीस विनायक सावळे आणि आडगावचे पोलीस पाटील गौतम खर्डे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रवासी संघटनेकडून नंदुरबार आगारात दीडशे एसटी बस फलक भेट

Next Post

जिल्ह्यातील एसटीचे चार आगारातील ५१६ कर्मचारी रूजू, ३३० बसच्या फेर्‍या; प्रवाशांना दिलासा

Next Post
जिल्ह्यातील एसटीचे चार आगारातील ५१६ कर्मचारी रूजू, ३३० बसच्या फेर्‍या; प्रवाशांना दिलासा

जिल्ह्यातील एसटीचे चार आगारातील ५१६ कर्मचारी रूजू, ३३० बसच्या फेर्‍या; प्रवाशांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add