Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील एसटीचे चार आगारातील ५१६ कर्मचारी रूजू, ३३० बसच्या फेर्‍या; प्रवाशांना दिलासा

team by team
April 18, 2022
in राज्य
0
जिल्ह्यातील एसटीचे चार आगारातील ५१६ कर्मचारी रूजू, ३३० बसच्या फेर्‍या; प्रवाशांना दिलासा

नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यापासून एसटीचे शासनात विलीकरण व्हावे, या मागणीसाठी कर्मचारी संपावर होते. दरम्यान न्यायालयाचा निकालानंतर एस.टी. कर्मचार्‍यांनी सेवेत रुजु होण्याचा निर्णय घेतला. आज नंदुरबार जिल्ह्यातील चार आगारातील ५१६ कर्मचारी कामावर हजर झाले असन एस.टी.चे चाके काहीशी गतिमान होवून जिल्हाभरात एस.टीच्या ३३० फेर्‍या मारण्यात आल्या. प्रवासी सेवा पुन्हा एकदा सुरळीत होण्याचे चिन्ह असून येत्या एक ते दोन दिवसात जिल्ह्यातील एसटया पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

एस.टी.चे शासनात विलीकरण व्हावे, या मागणीसाठी गेल्या सहा महिन्यापासून कर्मचार्‍यांना लढा सुरू आहे. सदर मागणी पूर्ण होईपर्यंत बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सहा महिन्यापासून एस.टी. कर्मचर्‍यांनी संप केल्याने प्रवासी सेवा विस्कळीत झाली होती. या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र न्यायालयाने दि.२२ एप्रिलपर्यंत सर्व कर्मचर्‍यांना सेवेत रूजू होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लढा विलीकरण संघाची बैठक होवून आज नंदुरबार, नवापूर, शहादा व अक्कलकुवा या चार आगारातील कर्मचारी कामावर रूजू झाले. जिल्ह्यातील या चार आगारातील १ हजार ४७६ कर्मचारी संपावर उतरले होते. दरम्यान आज पैकी ५१६ कर्मचारी कामावर रूजू झाले. यात नंदुरबार २९२, शहादा १३७, नवापूर ६०, अक्कलकुवा २७ कर्मचार्‍यांनी आज आपआपले आगार गाठत कागदपत्र सादर केले. नंदुरबार आगारातून आज १००, शहादा आगारातून १६०, नवापूर आगारातून ५० तर अक्कलकुवा आगारातून २० फेर्‍या बसने मारल्या. दरम्यान जिल्ह्यातील ज्या कर्मचार्‍यांना नोटीसी बजावण्यात आल्या होत्या.त्यांनी विभागीय कार्यालयाकडे अपील सादर केली.
आज विविध आगारांमध्ये रूजू होण्यासाठी कर्मचार्‍यांनी एकच गर्दी केली होती. येत्या एक ते दोन दिवसात नंदुरबार जिल्ह्यातील बससेवा सुरळीत होईल. असे आगार प्रमुखांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

निर्वस्त्र अवस्थेत डाकीण ठरवून दिले चटके, डाकीण पीडित महिलेचा अंनिस ने लावला शोध

Next Post

प्रहार अपंग क्रांती दलाच्या जिल्हा सल्लागार पदी ॲड दत्तात्रय कदमबांडे

Next Post
प्रहार अपंग क्रांती दलाच्या जिल्हा सल्लागार पदी ॲड दत्तात्रय कदमबांडे

प्रहार अपंग क्रांती दलाच्या जिल्हा सल्लागार पदी ॲड दत्तात्रय कदमबांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add