Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आडगाव येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात

team by team
April 18, 2022
in शैक्षणिक
0
आडगाव येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात

म्हसावद l प्रतिनिधी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार अंतर्गत आज रोजी शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आडगाव येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्याचे अध्यक्ष काळूसिंग ठाकरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नुराताई पवार, मोहन पवार,ज्येष्ठ नागरिक मुळासिंग ठाकरे ,पोलीस पाटील गौतम खर्डे, पिरामल फाऊंडेशनचे तालुका समन्वयक रमेश जायनाकर, अंगणवाडी सेविका चंद्रकला खर्डे, शिला रावताळे,स्वयंसेवक म्हणून सहदेव पवार,दिनेश पवार,संगीता तडवी,किरण पावरा,वासुदेव पवार, सत्तरसिंग मुसळदे हे लाभले होते.या मेळाव्याचे सूत्रसंचालन शिक्षक किसन वसावे यांनी केले.सुरवातीला गावात जनजागृतीसाठी विद्यार्थ्याची रॅली काढण्यात आली होती.या रॅली मध्ये विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या घोषना दिल्या.
रॅली नंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळापूर्व तयारी मेळाव्याचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. आणि नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.या मेळाव्यात स्टॉल प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.त्यात नाव नोंदणी,शारीरिक विकास,बौद्धिक विकास,सामाजिक व भावनिक विकास,भाषा विकास, गणन पूर्व तयारी,पालकांना उपक्रम साहित्य वाटप व मार्गदर्शन इत्यादी स्टॉल लावण्यात आले होते.या मेळाव्याचे आकर्षण म्हणजे यात सेल्फी पॉइंट लावण्यात आला होता.नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यानी त्यात स्वतःचे फोटो काढले तसेच ससा कार्टून मास्क, टोपी हे सुध्दा आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.मेळाव्यात प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.शेवटी आभार प्रदर्शन शिक्षक विनोद पाचपोळे यांनी केले.या सर्व कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी,सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.या मेळाव्याला डॉ. योगेश सावळे, केंद्रप्रमुख एल. एन.भावसार यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा आडगाव चे मुख्याध्यापक दिलीप पावरा,शिक्षक किसन वसावे,पंडित बारगीरे, धरमसिंग वसावे,विनोद पाचपोळे , पिरामल फाऊंडेशन चे रमेश जायनाकर यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

जयनगर येथील हेरंब गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीला मोठ्या संख्येने भाविकांना येण्याचे आवाहन

Next Post

‘जलजीवन मिशन’च्या नंदुरबार जिल्ह्यातील कामांच्या पूर्ततेसाठी सूक्ष्म नियोजन करावे: पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add