नंदूरबार l प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त युवारंग फाउंडेशन, नंदुरबार तर्फे एस.ए. मिशन हायस्कुल, नंदुरबार येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.ए. मिशन हायस्कुलचे उपमुख्याध्यापक व्ही. आर. पवार हे होते.तर प्रमुख अतिथी श्री.माळी, एपीआय, शहर पोलीस स्टेशन, प्रविण पाटील, पीएसआय शहर पोलीस स्टेशन तसेच श्री.राठोड, चंद्रशेखर चौधरी, युवारंग फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लुळे, सचिव राहुल शिंदे, उपाध्यक्ष देवेंद्र कासार ऋषिकेश मंडलिक भावेश मंडलिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमचे पुजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.
सामान्य ज्ञान स्पर्धेत लहान गटात प्रथम श्रृती संजय वाठोरे एस.एस.मिशन हायस्कुल, द्वितीय मनिषा सेवा पावरा एस.ए. मिशन हायस्कुल तर तृतीय दिक्षा राहुल भोये पीजी पब्लिक स्कुल तसेच मोठया गटात संजना गणेश नरभवर डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल, द्वितीय वैष्णवी राजेश रामोळे कमला नेहरु विद्यालय, तर तृतीय संजना संतोष वाघ, एस.ए. मिशन हायस्कुल यांनी यश संपादन केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या वेळी श्री. माळी यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात डॉ. बाबासाहेब यांचे विचार मांडले व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वाचन करावे तसेच मोबाईल पासून दूर रहावे या बद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल शिंदे यांनी केले तर आभार जिेतेंद्र लुळे यांनी मानले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. नुतनवर्षा वळवी, युवराज भामरे यांचे मार्गदर्शन लाभले.