नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार येथे भारतीय किसान सेना व भिलीस्थान लायन सेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
भारतरत्न महामानवडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती निमित्त भारतीय किसान सेना व भिलीस्थान लायन सेनेतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी, भारतीय किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी,शहराध्यक्ष राजेश माळी,भटके विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव ,जिल्हा उपाध्यक्ष अंकित वळवी, तालुकाध्यक्ष बिंदास गावित ,रिवदास वळवी,सुधाकर भिल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.