म्हसावद l प्रतिनिधी
भारतीय इतिहासातील स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर खाज्या नाईक प्रेरणा दिनानिमित्त 12 एप्रिल रोजी उनपदेव(दरा) ता.शहादा येथे सांस्कृतिक व प्रबोधन मेळावा संपन्न झाला.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आदिवासींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहीद झाले. आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील बाल क्रांतिवीर शिरीष कुमार यांना शिरीष कुमार हे शहीद झाले त्यांचे नाव देशाला माहीत आहे. परंतु शिरीष कुमार सोबत किरसिंग भील यांनादेखील इंग्रजांनी गोळी घालून ठार केले त्यांचे नाव इतिहासाच्या पानावर अजूनही का नाही? असा प्रश्न पालघर येथील काळुराम काका धोदडे उद्घाटने वक्तव्यात म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आप सुभाष नाईक तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप झेलसिंग पावरा यांनी मांडले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आप. डॉ. प्रीती पटले, सुभाष पवार, चंद्रसिंग बर्डे, सतीश पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्रकुमार गावित, डॉ.सुरेश नाईक, पल्लवी प्रकाशकर, रेखाताई पाडवी ॲड. वसावे, वनिताताई पटले, डॉ. महेश मोरे , सुनील गायकवाड, नामदेव पटले साहेब, सुरेश मोरे साहेब, रवी पेंटर उपस्थित होते.
परिसरातून अनेक ढोल वादक, बासरी वादक, सरपंच, पोलिस पाटील, कलाकार, सहभागी झाले होते. याप्रसंगी सत्तर ठाकरे यांच्याकडून परिसरातून आलेल्या सर्व कलाकार ढोल वादकांचा सन्मान करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शक व कलाकारांना प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीर खाजा नाईक उत्सव समिती व आदिवासी एकता परिषदेचे कार्यकर्ते मंगेश बर्डे, गंगाराम राहसे, आकाश मोरे, योगेश मगरे प्रकाश उखळदे, योगेश मगरे, वनसिंग पवार, सतीलाल शेमले आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.सूत्रसंचालन आदिवासी एकता परिषदेचे शहादा तालुका सचिव युवा कवी संतोष पावरा यांनी केले तर चुनीलाल ब्राह्मणे यांनी आभार मानले.