नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वडगाव येथे दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरुन पत्नीस फावड्याने मारुन जिवेठार केल्याप्रकरणी संशयित पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील वडगाव येथील जयसिंग भिका पावरा याने पत्नी सुनंदा जयसिंग पावरा यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून जयसिंग पावरा याने सुनंदा पावरा यांना लोखंडी फावड्याने हातावर व डोक्यावर मारुन गंभीर दुखापत करुन जिवेठार मारले. याबाबत दीपक दशरथ पावरा यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात जयसिंग पावरा याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप आरक करीत आहेत.