नंदुरबार| प्रतिनिधी
शहादा येथे विश्व हिंदु परिषद व बजरंग दलाच्या रॅली दरम्यान डिजी वाजविणे नाकारले या कारणावरून जिल्हाधिकार्यांचे मनाई आदेशाचे उल्लंघन करून गैरकायद्याची मंडळी जमवून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत जनप्रतिमा मल्लीन केल्याचा कारणावरून शहादा पोलीस ठाण्यात १५० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे राजा उर्फ राजेंद्र दिलीप साळी यांनी दि.११ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास विश्व हिंदु परिषद व बजरंग दलाची रॅली दरम्यान डीजी वाजविण्यात नाकारले. या कारणावरून जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेशाचे पालन करता जिल्ह्यात मनाई आदेश जारी असतांना गैरकायद्याची मंडळी जमवून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देवून विरोध केला व पोलीस दलाची जनप्रतिमा मलीन होईल. असे कृत्य वारंवार केले म्हणून पोलीस शिपाई किरण जिरे माळी यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात राजा उर्फ राजेंद्र दिलीप साळी व त्याचे साथीदार चंद्रकांत उर्फ गुड्डू पवार, मकरंद पाटील, प्रशांत पाटील, मनिष सुरेश चौधरी, अप्पु पाटील, जगदिश राजेंद्र बोरदेकर, विठ्ठल दत्तु बच्छाव, वैभव तांबोळी, संदिप तिरमले, दिनेश नेरपगार, जग्गू भोई, सनी उर्फ पराग संजय सोनार व इतर १५० जणांविरूध्द भादंवि कलम २९४ व महा पो अधि १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ व पोलीस (अप्रितीची भावना चेतवने) अधि १९२२ चे कलम ०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि मोरे करीत आहेत.