नंदुरबार l प्रतिनिधी
शनिमांडळ पाणीपुरवठा योजनेत कितीही तक्रारी केल्या. अडथळे, व्यत्यय आणले तरी तरी काहीही फरक पडणार नाही योजनेचे काम कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावून ग्रामस्थांचे प्रश्न सोडवण्यात येतील असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम विकास निधीतून शनिमांडळ येथे बहुउद्देशीय इमारत, व्यापारी गाळे व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन माजी आ.रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. चंद्रकांत रघुवंशी म्हणाले,गावाच्या पाणीपुरवठा योजनेत आमदार-खासदारांनी तक्रारी करून निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रक्रिया एक दोन वेळेस रद्द होईल. कुठल्याही परिस्थितीत योजना मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न करण्यात येतील.असे सांगत गोठयांचा योजनेत लाभ देण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पात्र लाभार्थ्यांकडून १० हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप रघुवंशी यांनी केला. लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याची बाब अत्यंत दुर्दैवी आहे. गरिबांना योजनेच्या लाभ मिळावा हा त्यांच्या अधिकार आहे. शासनाची योजना जनतेसाठी असते. योजनेतून लोकप्रतिनिधी पैसे उकळत असतील तर ही बाब दुष्काळाला निमंत्रण देणारी ठरेल. असे त्यांनी सांगितलेशनिमांडळ परिसरातील सर्व विकासकामे शासनाकडून मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. कोणततेही काम अपूर्ण राहणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेची फळी निर्माण करण्याचे आवाहन आ.रघुवंशी यांनी केले.
यावेळी माजी जि.प सदस्य डॉ.सयाजीराव मोरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रवींद्र गिरासे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी जि.प सदस्य जागृती मोरे,देवमन पवार, श्रीमती शकुंतला शिंत्रे,पं.स उपसभापती कमलेश महाले, माजी जि.प सदस्य रुचिका पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे, नगरसेवक रवींद्र पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील, एनटीव्हीएसचे संचालक संतोष पाटील,मुन्ना पाटील,जितेंद्र पाटील,मधुकर पाटील,कृष्णा राजपूत सुनील गिरासे,ठाणसिंग राजपूत उपस्थित होते.










