Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबारच्या प्रकल्प अधिकारी यांच्या गाडीला अपघात , एक जण ठार, गावकरी झाले आक्रमक

team by team
April 9, 2022
in क्राईम
0
नंदूरबारच्या प्रकल्प अधिकारी यांच्या गाडीला अपघात , एक जण ठार, गावकरी झाले आक्रमक

नंदूरबार l प्रतिनिधी

साक्री तालुक्यातील कळंभीर येथील रहिवाशी जगन मारणार (वय 52) यांचा गुरुवारी रात्री आठ वाजता अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जगन मारनर हे कळंभीर गावाकडून शेवाळी फाट्याकडून घराकडे त्यांच्या मोटरसायकल (क्रमांक एम. एच. 18, 2746) ने जात असताना समोरून येणार्‍या ईनोवा कारने (क्रमांक एम. एच. 5, 7268) जोरदार धडक दिली. यात जगन मारनर यांना गंभीर दुखापत झाली. प्रारंभी त्यांना साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील हॉस्पिटलला हलविण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
अपघात झाला त्या ठिकाणी कळंभीर गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. अपघातातील इनोवा कार कोणाची आहे, त्यात कोण बसलेले होते, याबाबत उपस्थित नागरिकांनी विचारपूस केली असता त्या गाडीत नंदुरबार येथील प्रकल्प अधिकारी मिनल करणवाल असल्याचे कळले त्यांनाही किरकोळ दुखापत झाली होती. संबंधित महिला अधिकार्‍यांबरोबर एक पोलीस शिपाई असल्याचे कळले.
आज साक्री पोलीस स्टेशन येथे संबंधित इनोवा कार चालक रोशनकुमार मोरे रा. नंदुरबार यांच्यावर व गाडीतील संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा यासाठी आज साक्री पोलीस स्टेशन येथे कळंभीर गावातील मृत इसमाचे नातेवाईक व गावकर्‍यांनी गर्दी केली.
संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मयतावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका मयताच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी धरल्यामुळे साक्री पोलीस स्टेशन समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस इन्स्पेक्टर अजय चव्हाण करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

विशेष घटक योजनेतील निधी खर्चात जिल्हा राज्यात अव्वल,१०० टक्के निधीचा विनियोग ; सीईओंकडून समाजकल्याण सभापतींचा सत्कार

Next Post

गोठयांचा योजनेत लाभ देण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी लाभार्थ्यांकडून १० हजार घेतल्याचा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add