नंदुरबार ! प्रतिनिधी
राज्यातील २५ जिल्ह्यातील कोरोना वाढीचा दर अल्प आहे . कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्यानंतर राज्य अनलॉक करण्याची मागणी मंत्र्यांकडूनही जोर धरत आहे . या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी टास्क फोर्सबरोबर चर्चा केली होती. मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर असल्यामुळे या आदेशावर सही होऊ शकलेली नाही . त्यामुळे आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही होऊन आज लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा आदेश जारी होण्याची शक्यता आहे .
लॉकडाऊनचे नियम शिथील करण्याबाबत टास्क राज्यातील २५ जिल्ह्यासाठी टास्क फोर्सबरोबर चर्चा झाल्यानंतर नियम जाहीर होतील अशी शक्यता होती . मात्र अजूनही याबाबतचे आदेश जारी झालेले नाहीत . या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही बाकी असल्याने तो रखडला आहे . राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यावी अशी मागणी जोर धरत आहे . राज्यभरातील लहान व्यापारी दुकानांच्या वेळा वाढवण्याची मागणी
करीत आहेत.गेल्या दोन महिन्यांपासून
व्यापा ऱ्यानी विविध माध्यमातून ही मागणी केली आहे . मुख्यमंत्री उद्भव ठाकरे हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर असल्यामुळे या आदेशावर सही होऊ शकलेली नाही . त्यामुळे आज आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही होऊन तो जारी केला जाण्याची शक्यता असून १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जाणार असल्याचे समजते . राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनीही मंत्रीमंडळ बैठकीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची मागणी अनेकदा लावून धरली . मात्र मुख्यमंत्री शिथिलता देण्याच्या मानसिकतेत नव्हते . गुरुवारी पार पडलेल्या टास्क फोर्सबरोबरच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली . या बैठकीनंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा आदेश जारी होईल असं सांगितलं जात होत . याबाबतचे आदेश तयार असल्याची माहिती आहे , मात्र याबाबतच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही झाली नसल्याने आदेश जारी होऊ शकलेले नाहीत .