Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली

Mahesh Patil by Mahesh Patil
July 31, 2021
in राज्य
0
राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली

नंदुरबार ! प्रतिनिधी
राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल कदापिही विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नेते देशमुख यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात कायम राहील. सर्वच पक्षांत त्यांच्या विचारसरणीचे चाहते होते. संसदीय कार्यप्रणालीवर त्यांचा नितांत विश्वास होता. त्यामळे विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांचा सर्वपक्षीयांना मार्गदर्शक म्हणून आधार होता, धाक होता. कष्टकरी- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची तळागाळापर्यंत ओळख होती. यातूनच त्यांनी विधिमंडळात अनेक कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा केला. अशा योजनांना त्यांनी नेहमीच पक्षीय भेदापलिकडे जाऊन पाठबळ दिले. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
बातमी शेअर करा
Previous Post

अवैध वृक्षतोड प्रकरणातील संशयीयांच्या सुटकेसाठी ग्रामस्थांचे रात्री पर्यंत ठीय्या

Next Post

राज्यात लॉकडाऊन मध्ये शिथिलतेबाबत आज होऊ शकते घोषणा, १ ऑगस्ट पासून अनलॉकची शक्यता, सोमवार पासून रात्री ८ वाजे पर्यंत दुकादारांना मुभा ?

Next Post
ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात लॉकडाऊन मध्ये शिथिलतेबाबत आज होऊ शकते घोषणा, १ ऑगस्ट पासून अनलॉकची शक्यता, सोमवार पासून रात्री ८ वाजे पर्यंत दुकादारांना मुभा ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी आश्रमशाळेत नवीन वेळापत्रक लावू नये,जुनेच वेळापत्रक कायम ठेवण्याची बिरसा फायटर्सची मागणी

आदिवासी आश्रमशाळेत नवीन वेळापत्रक लावू नये,जुनेच वेळापत्रक कायम ठेवण्याची बिरसा फायटर्सची मागणी

May 31, 2023
तापी नदी परिसराची स्वच्छता,श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबारचा पर्यावरण पूरक उपक्रम

तापी नदी परिसराची स्वच्छता,श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबारचा पर्यावरण पूरक उपक्रम

May 31, 2023
अरे व्वा : वर्षाकाठी शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये

अरे व्वा : वर्षाकाठी शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार रुपये

May 31, 2023
केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

May 31, 2023
माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना मातृशोक

माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना मातृशोक

May 30, 2023
अक्कलकुवा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात

अक्कलकुवा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हास्तरीय बैठक उत्साहात

May 30, 2023

एकूण वाचक

  • 4,561 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group