नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका जेष्ठ नागरीक संस्थेतर्फे होलिकोत्सव साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार व शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष वसंतराव चौधरी यांनी केली. यावेळी मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी ज्येष्ठ नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्यात व सांगितले की संस्थेला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास तुम्ही मला सांगा मी सर्वोपतरी मदत करेल असे आश्वासन दिले. कार्यक्रमात सीमा मोडक यांनी नाम जप या विषयावर सभेला मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची सांगता प्रसाद वाटप करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत चौधरी ,उपाध्यक्ष अशोक टेंबेकर ,राजाराम निकम,सोमनाथ शिंपी, संस्थेचे कार्याध्यक्ष पी. एन. माळी, रामा चौधरी ,रवींद्र भावसार, बाबुराव तवर,मनोहर बजाज, महिला अध्यक्षा श्रीमती देवकन्या सोनार ,सरला बजाज ,लता टेभेकर,भारती चौधरी ,सुलोचना सोनार, हेमलता जयस्वाल व ज्येष्ठ नागरिक संख्येचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव राधेश्याम सोनार यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष अशोक टेंभेकर यांनी केले.