नंदुरबार ! प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग कमी असणाऱ्या राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात येत असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली असून यात जळगाव नंदुरबार, धुळ्याचा समावेश आहे . यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध उठणार असून स्थानिक पातळीवर याबाबत लवकरच निर्णय जाहीर होणार आहे .
राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे . तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत , अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली . आज टास्क फोर्सची बैठक पार पडल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना याबाबतची माहिती दिली . टास्क फोर्सची मिटींग पार पडली . त्यात 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे . तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल . त्यावर ते सही करतील . त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे , असं टोपे यांनी सांगितलं .
दरम्यान , आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंध उठविण्याबाबत घोषणा केली असली तरी स्थानिक प्रशासन स्वतंत्र नोटिफिकेशनच्या माध्यमातून याची स्थानिक पातळीवर घोषणा करणार आहे . यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या घोषणेपर्यंत जिल्ह्यात निर्बंध लागू राहतील हे स्पष्ट आहे .
२५ जिल्ह्यात निबंध शिथील होणार आहे . त्यात नाशिक , जळगाव , धुळे , नंदुरबारचा समावेश आहे . या जिल्ह्यात शनिवारी दुकाने सुरु होणार आहे .
११ जिल्ह्यात निर्बंध कायम राहणार आहे . त्यात उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याचा समावेश आहे . या ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत , अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली .