Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्यातील पर्यटन स्थळांची जगाला ओळख व्हावी यांसाठी एका अवलीयाची बिलगावची एक रमणीय सफर

Mahesh Patil by Mahesh Patil
July 29, 2021
in सामाजिक
0
सातपुड्यातील पर्यटन स्थळांची जगाला ओळख व्हावी यांसाठी एका अवलीयाची बिलगावची एक रमणीय सफर

स्थळ- बिलगाव  ता.धडगांव

आकर्षण- बारधार्‍या धबधबा,नर्मदा नदी
अंतर – धडगाव पासून एकूण २० किमी ,नंदुरबार रेल्वे स्टेशन पासून ९० किमी,शहादा हे जवळचे बस डेपो आहे .

धडगांव येथील इंजि.प्रविण चिमा पावरा यांनी सदर अनुभवाचे बोल लेखनीतुन लिहीले आहे.सातपुडा लोकांना कळला पाहिजे,सातपुडा लोकांनी जगला पाहिजे ,अनुभवला पाहिजे. त्यांनी सातपुडा भ्रमंती चालू केली यात काही विशेष स्थळे आहेत जे पूर्णतः बाहेरील जगापासून अनभिज्ञ आहेत.त्या ठिकाणांची जगाला ओळख व्हावी,सातपुड्यात पर्यंटनाला वाव मिळावा यासाठी ते सातपुडा पर्यटन चा एक शोध च्या व्दारे ते झटत आहे.


पावसाळा हा ऋतू सर्वाना हवा हवासा वाटणारा आणि सातपुडा मध्ये तर हा ऋतू नवीन बहर घेवून येतो.पाऊस सोबत घेऊन येतो नवीन ध्येय,नवीन आशा अशा अनेक गोष्टी सातपुडा ला भेटतात .पानझडी प्रकराच्या वृक्ष वने आपल्या सातपुड्या मध्ये आढळतात यामुळे या ठिकाणी पूर्ण सातपुडा मध्ये नवीन पालवी फुटलेली असते जि सर्वाना आकर्षित करतात.हिवाळा येता येता पूर्ण सातपुडा घनदाट जंगलात रुपांतर होते.ओढे,नद्या नवीन रुपांतर घेऊन प्रवाहित झालेले असतात.त्यामुळे आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवार घालवण्यासाठी सातपुड्यात अनेक ठिकाणे उपलब्ध आहेत. मि यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणा बद्दल लिहिले आहे.यातच सध्या तरी सातपुडा अनेकांना आकर्षित करत आहे.तीनसमाळ चा लेख वाचल्यापासून अनेक पर्यटकांनी संपर्क केला त्यांनी याची सफर केली त्यांचे विचार शेअर केले.खरच आता सातपुडा पर्यटन ला चांगले दिवस येतील असे वाटले,यामुळे पुन्हा एकदा सातपुडा भ्रमंती चालू केली यात काही विशेष स्थळे आहेत जे पूर्णतः बाहेरील जगापासून अनभिज्ञ आहेत.यातच बिलगाव हे गाव छोटेसे गाव आपणास माहिती असेलच.स्वदेस चित्रपट ची प्रेरणा या ठीकानुच घेतली गेली असे तरी मला वाटते.या ठिकाणी असणारा धबधबा सर्वांचे आकर्षण चे केंद्र बिंदू आहेच.


असाच एक रविवार या ठिकाणी आम्हांस घेऊन आलाच नेहमिप्रमाणे सोबत कोण येतंय हे पाहून काहीही प्लान न  करताच मि वन्या,पिंट्या,आणि इंदास निघालो बिलगाव कडे नेहमीचा मार्ग न घेता मला आवडनारी खडतर वाट गेंदा ची निवडली जाता जाता येथील निसर्ग अनुभवण्याचा माझा विचार होता पं घाटात आलोच कि लोक कसे जीवघेणा प्रवास करतात हे पाहून अंगावर काटाच आला निमखेडी हून गेंदा पर्यंत आलो वाटेत निसर्ग चहुबाजूनी आनंदाची उधळण करत होता.माझे आवडते ठिकाणी गेंदा जे आजपर्यंत अनभिज्ञ होते टे हळूहळू पर्यटकांना आकर्षित करत होते पण पावसाळ्यात या ठिकाणी कोणीही जाऊ नये अशी विनंती सर्वाना.या ठिकाणी उदय नदी अत्यंत वेगवान वाहते यामुळे येथे कुंड तयार झालेत तसेच यामुळे खोल निमुळती दरी तयार झालीय याचे सर्व फोटो आपण पाहिलेच असाल पण आता पाऊस असल्या कारनाने सगळीकडे पाणीच आहे.गेंदा हून आम्ही बिलगाव ला पोहचलो वाटेत शेतामध्ये आमच्या आदिवासी पद्धतीने वसलेली घरे डोळ्यांची पारणे फेडत होते.यातच समोर नर्मदा नदी म्हटले कि सुंदरतेत आणखीन मोलाची भर पडते.साधारण धडगाव पासून २० किमी अंतरावर वसलेले हे गाव कधी काळी स्वतची वीज निर्मिती करत होते संपूर्ण गावाला या ठिकाणाहून वीज पुरवठा केला जात होता.पण बर्‍याच वर्ष पूर्वी आलेल्या महापुरात संपूर्ण वीज प्रकल्प वाहून गेला आणि पुन्हा एकदा बिलगाव अंधाराच्या काळोखात हरवून गेले.

पण शासनाच्या अथक प्रयत्नाने या ठिकाणी वीज पोहचली आहे.बिलगाव हे दोन नद्यांच्या संगमवर वसलेले गाव आहे.उदय नदी व टिटवळी या दोन नंद्यांच्या संगमावर वसलेले हे गाव पंचक्रोशीत नावाजलेले आहे.या शासकीय आरोग्य केंद्र व शासकीय आश्रम शाळा असल्याने शेजारील ३० गावांचा या ठिकाणी कायम संपर्क असतोच.सध्या सोशल मिडिया मधून या ठिकाणचे बरेच फोटो वायरल झाले आहेत.बरेच धडगाव आणि आजूबाजूच्या तालुक्यातील पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.यामुळे हळूहळू पावसाळ्यात हा परिसर शनिवारी आणि रविवारी गजबजत आहे.जेव्हा बिलगाव ला पोहचलो तेव्हा दुपारचे १ वाजून गेले होते.दोन फोर व्हील गाड्या नदीच्या पुलावरच पार्क केलेल्या दिसून येत होत्या.माझा लहान भाऊ पिंट्या याचे १० पर्यंत शिक्षण याच ठिकाणी झाल्याने आमचा गाईड हा तोच होता फक्त धबधबा न पाहता आजूबाजूचा परिसर सुद्धा पाहायचा असल्याने आमच्या दृष्टीने आमचा गाईड निष्णात होता.थेट धबधब्याकडे जाणारा रस्ता हा आश्रम शाळेतून जातो.आश्रम शाळेच्या गेट मधून थेट शेवटी १० मिनिट चालत गेलो  सरळ संगमाच्या ठिकाणीच पोहचलो शाळेचे विद्यार्थी हा मार्ग येण्या जाण्यासाठी वापरत असावे याच ठिकाणी जुन्या वीज प्रकल्पाचे अवशेष आपणास अजूनही पाहायला मिळते.म्हणजे आपण विचार करू शकतो कि त्यावेळेस आलेला महापूर किती जबरदस्त असेल.या ठिकाण हून उदय नदीवर असलेला बारधार्‍या धबधबा गर्जत कोसळत होता.उदय नदीचे पाण्याचे पात्र एकदम दुथडी भरून वाहत होते.त्यामुळे या ठिकाणी पाण्यात उतरण्याची कल्पना सुद्धा मनात आणणे चुकीचे तसेच शांत नदीचे पात्र सुद्धा धबधबा असल्याने धोकादायक बनते यामुळे येथे कोणीही पाण्यात उतरण्यचे साहस करूच नये.एकदम दोन नद्याच्या संगम वर हे स्थळ असल्या कारणाने अजूनही प्रेक्षणीय बनते आणि आपणास विलोभनीय दृश्य पाहायला मिळते.वरून दिसणारा हा धबधबा समोर पाहण्यासाठी आमची स्वारी वळली ती वीज प्रकल्प च्या बाजुने नदी पात्राच्या बाजूने जाणार्‍या पायवाट कडे येथून छोटीसी लहान वाट खाली टिटवळी नदीच्या पात्र कडे जात होती वरून टेकडी वरून वाहणारी उदय नदी त्यावरून कोसळणारा धबधबा आणि त्याला खाली मिळणारी  टिटवळी नदी मनमोहक दृश्य ने आम्ही सर्व भारावून गेलो उदय नदी च्या मानाने टिटवळी एकदम शांत वाहत होती ठिकठिकाणी ओलांडायला जागा होती काही ठिकाणी कमरे एवढे पाणी होते.आम्ही काय भटकेच उतरलो नदीत सगळे कपडे काढून पाणी शांत होते कॅमेरा साभाळून झालो सामील आम्ही नदीत यातच समोरून धबधबा खाली येत असताना पाणी शॉवर प्रमाने वातावरणात मिसळत होते.हा प्रसंग हा प्रत्यक्ष अनुभवला तरच कळेल आम्हाला काय अनुभव आला तो शब्दात व्यक्त करता येत नव्हता.पाण्यात मनोसोक्त डुंबत कॅमेरा झटपट सर्व दृश्य टिपत होताच .खाली कोणीच पर्यटक नव्हते फक्त स्थानिक लोक होते जे या ठिकाणी मासेमारी करत होते.याच लोकात पिंट्या चा एक जुना मित्र भेटला जो मासे पकडत  होता.आजूबाजूला अनेक जागा होत्या ज्या  पर्यटकांना मोहित करू शकत होत्या.या ठिकाणी निवांत एक दिवस नसर्ग बरोबर घालवायला कोणालाही आवडणार,यातच पिंट्या मित्राने आम्हाला त्याने पकडलेले मासे दाखवले आम्ही मासे पाहूनच चक्रावलो एवढे मोठे मासे फक्त फोटो आणि ढत मध्ये पाहतात.एक एक मासा ४ ते ५ किलो एवढा भरेल असा होता तो सुद्धा जिवंत पाण्यात बांधून होता.आणि या ठिकाणीच मासे खाण्याची लालसा वाढीला लागली.आम्ही यासाठी विकत देता का अशी बोलणी केली पं त्यांनाच पार्टी करायची होती त्यामुळे स्पष्ट त्यांनी नकार दिला.एवढे मोठे मासे हे नर्मदा नदीचे इरलज्ञ थरींशी चा एरिया एवढ्या लांब पर्यंत होता त्यामुळे सहजच मोठे मासे या ठिकाणी मिळत होती बाकी लोकाकडे चौकशी केली असता त्याच्या कडे एवढे मोठे मासे नव्हते.मग काय आज मासे नक्की खायचे हा प्लान फिक्स झाला.आम्ही भूषा ला मामा कडे जाणारच होतो तेथून घेऊ मासे असे ठरले.नदीच्या साईडला असेच बर्मुडा वर भटकत होतो आवडणारे जागा कॅमेरात कैद होत होती.आता कॅमेरा  बाजूला ठेवून मला पोहण्याची खूप इच्छा होत होतीच मग काय ठेवला कॅमेरा बाजूला आणि मारली पाण्यात उडी ,आता मि ठेवलेल्या कॅमेरा माझा भाऊ पिंट्या च्या हाती लागला होता आणि त्याने माझेच काही फोटो काढले होते सहसा कधी माझेच फोटो येत नसत पण आज काही आले होते.पोहताना या धबधबा ला बारधार्‍या का म्हणतात म्हणून धबधबा किती ठिकाणहून खाली येतो हे मोजत बसलो आणि काय सर्वात जास्त मोठे प्रवाह एकूण बारा होते म्हणजेच बारा धारा याचेच नाव तयार झाले बारधार्‍या आणि आमच्या पावरी भाषेत बार खोल्लू असे सुद्धा म्हणतात.सहजच पाण्यात बसून या ठिकाणच्या पर्यटन वाढी बद्दल विचार चक्रे फिरू लागले बरेच गोष्टी होत्या ज्या केल्या पाहिजे होत्या येथे होणारे अपघात टाळले पाहिजे,सातपुडा पर्यटन वाढले पाहिजे या दृष्टीने बर्‍याच गोष्टी मनात पक्क्या केल्या आणि या ठिकाणाला बाय बाय करत परत पुला पाशी येण्यास निघालो.पुला पाशी आल्यावर माझी प्रेमळ बाईक मला धोका देईल असे वाटले नव्हते आज गेल्या १० वर्षात बंद पडली.बॅटरी गेली कामातून धक्का स्टार्ट केली पण तरी सुद्धा बाईक इंजिन खरखर करतच तशीच भूषा च्या दिशेने बाईक पिटाळली १५ मिनिट मध्ये मामा च्या घरीच जाऊन थांबलो .भूषा येथील मामा चे नामांकीत घर तसेच मामी येथील सरपंच सुंदर टुमदार घरे आणि खाली नर्मदा चे विशाल रूप ,या घराकडे जाणारे छोटे मोठे रस्ते आणि सर्व हिरवळ पिकात हि हरवलेली घरे,यातच या घराच्या छपरावर चढलेले भोपळा चे वेल पूर्ण छपर भर पसरले होते.याची एक स्पेशल फिलिंग आले आणि मामा च्या घरात आजी आजोबा ला बर्‍याच दिवसांनी भेटलो यामुळे बरे वाटले.येतो असे सांगून थेट भूषा पॉईंटला पोहचलो जेथून बाकी गावांना जाणार्‍या बोटी उपलब्ध असतात.तसेच अनेक मासेमार येथे मासे घेऊन असतात,बिघडलेली बाईक अशीच पिटाळत त्या ठिकाणी पोहचलो नर्मदा धरणाची उंची वाढल्याने बॅक वॉटर चा बराच नवीन भाग तयार झाला होता नेहमी दिसनारी नर्मदा नदी मधील टेकडी पाण्या खाली गेली होती.एवढी मोठी टेकडी पाण्या खाली गेली म्हणजे अजून काय काय पाण्यात बुडाले असेल याचे विचार करूनच मन कुठे तरी हरवून गेली.शहरातील लोकांना वीज,पाणी वेळेवर मिळावे त्यांचा विकास व्हावा म्हणून येथे आदिवासी मरत होता पण याची कोणालाही पडलेली नाही आहे.विकासाची गरज आदिवासी ला आहे हे कधी समजणार काय माहिती ,यातच आमची मासे शोधायची भटकंती चालू झाली नदीत मासे पकडणार्‍या लोकांना लाबुनच हाक मारून विचारत होतो.एका कडे चांगला मोठा मासा मिळाला पण तो खूप लांब होता यामुळे दोन तास एका ठिकाणी बसूनच टाईमपास करत होतो.संध्याकाळ होत होती आणि डोंगराच्या कपारीत सूर्यास्त होत होता.असे हे सुंदर दृश्य डोळ्याचे पारणे फेडत होते.२ तासात आमचा बोटी वाला आला पण एकच ३ किलो चा मासा घरी घेऊन जायला मिळाला पण नशिबात मासे होते परत नेहमी च्या ठिकाणी आलो तर तिथेच एका बोटीत बरेच मासे होते.काय ३ व ४ किलो चे असे दोन मासे मिळले आम्हाला.वेल खूप झालीच होती परत मामाच्या घरी आलो पण येथे आधीच मस्त गावराणी चिकन चा बेत होता.या ठिकाणी ताव मारून रात्री ८ वाजता धडगाव च्या दिशेने निघालो वाटेत १० वेळा बाईक बंद पडत होती.ढकलत चालू करत होतो.पोटातले केव्हाच जिरले.कसेबसे घरी पोहचलो.आणलेले मासे रात्रीचा टिक्का बनवून टाळून खाल्ले. या तंद्रीतच केव्हा झोप लागली ते कळलेच नाही.अशी हि विलोभनीय सफर आपणासमोर माझ्या जेमतेम भाषेत मांडत आहे.उद्देश एकच कि सातपुडा लोकांना कळला पाहिजे,सातपुडा लोकांनी जगला पाहिजे ,अनुभवला पाहिजे.सातपुडा पर्यटन चा एक शोध असाच चालू राहील जो पर्यंत उद्देश सफल होत नाही.सर्वांनी येथे एकदा जरूर यावे.येथील मास्यांचा स्वाद जरूर घ्यावा.स्वतःला सुरक्षित ठेवून येथील पर्यटन चा आनंद नक्की घ्यावा.

बातमी शेअर करा
Previous Post

अश्लिल चित्रफित सोशल मीडियावर टाकने पडले महाग; तिघांविरोधात गुन्हा, एका संशयिसात अटक

Next Post

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात येत असल्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा, नंदुरबार, धुळे निर्बंधा बाबत काय ?

Next Post
महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात येत असल्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा, नंदुरबार, धुळे  निर्बंधा बाबत काय ?

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात येत असल्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा, नंदुरबार, धुळे निर्बंधा बाबत काय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील १८ गावांमध्ये जल जीवन मिशनच्या कामांचे जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते भूमिपूजन

नंदुरबार तालुक्यातील १८ गावांमध्ये जल जीवन मिशनच्या कामांचे जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते भूमिपूजन

February 4, 2023
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे  महामार्गा खड्डेमुक्त आंदोलन, निदर्शने नोंदवून वेधले शासनाचे लक्ष

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे महामार्गा खड्डेमुक्त आंदोलन, निदर्शने नोंदवून वेधले शासनाचे लक्ष

February 4, 2023
दोडांईचा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचार – प्रसाराला वेग 

दोडांईचा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचार – प्रसाराला वेग 

February 4, 2023
दुधवे येथे ५० हजाराचे अवैध सागवानी लाकूड जप्त

दुधवे येथे ५० हजाराचे अवैध सागवानी लाकूड जप्त

February 4, 2023
युवा कवि संतोष पावरा यांना, व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहिर

युवा कवि संतोष पावरा यांना, व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहिर

February 4, 2023
 रस्त्यांची दुर्दशा : ६ फेब्रुवारी रोजी म्हसावद येथे रस्ता रोको आंदोलन

 रस्त्यांची दुर्दशा : ६ फेब्रुवारी रोजी म्हसावद येथे रस्ता रोको आंदोलन

February 4, 2023

एकूण वाचक

  • 2,731,054 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group