नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांची अमळनेर विधानसभा मतदार संघाचे मा.आ.शिरीष चौधरी यांच्यासह नंदुरबार आरपीआय आठवले पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी सदिच्छा भेट घेतली व नंदुरबार जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्यावतीने शबरी व रमाई घरकुल योजनेचे लाभार्थ्यांचे उद्दिष्ट वाढविण्याबाबत निवेदन दिले .
या निवेदनात युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील यांनी म्हटले आहे की, यापूर्वी शबरी व रमाई घरकुल योजनेचे लाभासाठी जिल्ह्यातील आदिवासी, दलित बांधवांनी अर्ज सादर केलेले आहेत. परंतु आदिवासी व दलित समाजाच्या जिल्हानिहाय लोकसंख्येनुसार लाभार्थ्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. त्यामुळे सदर योजनेचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही. तरी शबरी तथा रमाई घरकुल योजनेचे उद्दिष्ट किमान गाव निहाय दुप्पट करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.