Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेचे प्राथ.शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन

team by team
March 15, 2022
in शैक्षणिक
0
प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेचे प्राथ.शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांना प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या खालील मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील मागण्या मान्य झालेल्या नाहीत. तरी प्रशासनाने सदर प्रकरणात लक्ष देवून खालीलप्रमाणे लवकरात लवकर पूर्ण करणेस निवेदन सादर करण्यात आले आहे. यात शिक्षकांचे वेतन वेळेवर देण्यात यावे. सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे पेन्शन मंजुरीचे आदेश सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळावेत. मयत शिक्षकांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी. शिक्षकांची वैद्यकीय बिले वेळेवर मंजुर करण्यात यावीत. शिक्षकांना चटोपाध्याय वरिष्ठ व निवडश्रेणी मंजुर करावी. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील विज्ञान विषय शिक्षकांच्या जागा भराव्यात. जिल्ह्यातील अतिरिक्त समाजशास्त्र विषय शिक्षकांचे नकार मंजुर करावेत. शिक्षकांना केंद्रप्रमुख , शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देणे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावीत . शिक्षकांची सेवापुस्तके पडताळणी होणेबाबत तालुकास्तरावर शिबिर आयोजित करणे . शिक्षकांचे ऑनलाईन उपक्रम आणि माहिती भरण्याची कामे कमी करुन ऑफलाईन अध्यापनासाठी मोकळीकता द्यावी. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना अंशदायी पेन्शन रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी. शिक्षकांच्या गोपनिय अहवालाची गोपनिय प्रत मिळणेबाबत. वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्यात यावी. २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी देण्यात यावी. कोविड कर्तव्यावर असतांना कोविड -१९ ने मृत झालेल्या शिक्षकांना ५० लाखांचे विमा कवच सानुग्रह अनुदान विनाविलंब मिळावे व कोविड -१ ९ कर्तव्य बजावत असतांना संक्रमण झालेल्या शिक्षकांना विशेष रजा मिळाव्यात. जी.पी.एफ. स्लिपा मिळणेबाबत. तरी वरिल सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करणेबाबत आपल्यास्तरावरुन प्रयत्न होणेस विनंती अन्यथा प्रहार शिक्षक संघटनेमार्फत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्हा परिषदेचा २३ कोटी ३१ लाख ५० हजाराचा शिलकी अर्थसंकल्प उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांनी केला सादर

Next Post

जिल्ह्यातील तापमानाचा पारा पुढील काही दिवस अजून वाढणार, ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज

Next Post
जिल्ह्यातील तापमानाचा पारा पुढील काही दिवस  अजून वाढणार, ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज

जिल्ह्यातील तापमानाचा पारा पुढील काही दिवस अजून वाढणार, ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add