Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्हा परिषदेचा २३ कोटी ३१ लाख ५० हजाराचा शिलकी अर्थसंकल्प उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांनी केला सादर

team by team
March 15, 2022
in राजकीय
0
नंदूरबार जिल्हा परिषदेचा २३ कोटी ३१ लाख ५० हजाराचा शिलकी अर्थसंकल्प उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांनी केला सादर

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जि.प.च्या सर्वसाधारण सभेत काल अर्थ व बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांनी सन २०२२-२०२३ चे ६४ कोटी १९ लाख ६ हजार ६९३ रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. ४० कोटी ८७ लाख ५६ हजार ४०५ रुपयांचा संभाव्य खर्च जाता २३ कोटी ३१ लाख ५० हजार २८८ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सभेत सादर करण्यात आला.
नंदुरबार जि.प.ची सर्वसाधारण सभा काल जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, सभापती रतन पाडवी, अजित नाईक, गणेश पराडके, निर्मला राऊत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यासह विविध विभाग प्रमुख, जि.प. सदस्य, पं.स.सभापतींच्या उपस्थितीत संपन्न झाली. सदरच्या सभेत जि.प.व पंचायत समित्यांसह स्वत:च्या उत्पन्नाचे जमा व खर्चाचे सन २०२१-२०२२ चे सुधारीत अंदाज पत्रक व सन २०२२-२०२३ चे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या अनुदान विचारात घेवून तसेच जि.प.च्या विविध विभागांची स्वउत्पन्नाची जमा रक्कम विचारात घेवून सन २०२२-२३ चे मुळ अंदाजपत्रक काल अर्थ समिती सभापती ॲड.राम रघुवंशी यांनी सादर केले. एकूण ६४ कोटी १९ लाख ६ हजार ६९३ रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये आरंभिच्या महसूली शिलकीत १३ कोटी ८२ लाख ८६ हजार ८६४ व भांडवली शिलकीत २६ कोटी ७१ लाख २७ हजार ८०६ असे एकूण ४० कोटी ५४ लाख १४ हजार ६७० इतकी आरंंभिची शिल्लक व महसूली अंदाजित जमा रकमेत ८ कोटी १४ लाख ९२ हजार २३ व अंदाजित भांडवली जमा रकमेत १५ कोटी ५० लाख असे एकूण २३ कोटी ६४ लाख ९२ हजार २३ रुपये आरंभिची शिल्लक आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी २१ कोटी ६७ लाख ५६ हजार ४०५ इतका महसूली संभाव्य खर्च तर १९ कोटी २० लाख इतका भांडवली खर्च असा एकूण ४० कोटी ८७ लाख ५६ हजार ४०५ रुपयांचा संभाव्य खर्च वजा जाता २३ कोटी ३१ लाख ५० हजार २८८ रुपये शिल्लक राहणार आहेत.
जि.प.अंदाजपत्रकासोबत पं.स. वाढीव उपकर अनुदान, घसारा निधी व ग्रामीण पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती निधी यांचेही जमा व खर्चाचे सुधारीत व मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. ग्रामीण भागातील समस्या व जि.प. प्राप्त होणारे मर्यादीत उत्पन्न याचा मेळ घालून ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने जि.प. अर्थसंकल्पात तरतूदी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे समाजकल्याण विभागाकरीता २० टक्के, महिला व बालकल्याण विभागाकरीता १० टक्के, ग्रामीण पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्तीकरीता २० टक्के, दिव्यांग कल्याणकरीता ५ टक्के व शाळा देखभाल दुरुस्तीकरीता ५ टक्के, बंधनकारक स्वरुपाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे भोई समाज महिला पंच मंडळातर्फे महिला जनजागृती व्याख्यान

Next Post

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेचे प्राथ.शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add