Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या पाचही संशयित आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासात ठोकल्या बेड्या

team by team
March 13, 2022
in क्राईम
0
पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या पाचही संशयित आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासात ठोकल्या बेड्या
नंदुरबार | प्रतिनिधी
महिलेच्या वादातुन वृध्दास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या पाचही आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासात अटक केेली.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१२ मार्च रोजी बुल्या हांदया वळवी रा . सोरापाडा ता . अ.कुवा हे त्यांच्या राहत्या घराच्या अंगणात झोपलेले असतांना पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती हे तोंडावर रुमाल बांधून बुल्या वळवी यांच्याजवळ आले. त्यातील एकाने हातातील बाटलीने फिर्यादीचे अंगावर पेट्रोल टाकून व दुसर्‍या व्यक्तीने त्याच्या हातातील आगपेटीने काडी ( आग ) लावून फिर्यादीस जिवे ठार मारण्याचा उद्देशाने पेटवून दिले म्हणून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरुध्द् जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात येऊन बुल्या हांदया वळवी यांना औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे दाखल करण्यात आले होते . हा अत्यंत गंभीर व संवेदनशील प्रकार होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक  पी . आर. पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे पथक तयार करुन आरोपी तात्काळ ताब्यात घेऊन घेण्याबाबत निर्देश दिले होते बुल्या हांदया वळवी हे सुरुवातीस काही ही बोलण्याच्या स्थितीत नव्हते परंतु प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर बुल्या वळवी हे थोडे फार बोलू लागले तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना सुरुवातीस विचारपुस केली असता बुल्या वळवी यांनी सांगितले की , दि. १२ मार्च २०२२ रोजी ते त्यांच्या अंगणात झापलेले असतांना तोंडाला रुमाल बांधलेले दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याजवळ येवून हिंदी भाषेत आज तुमको छोंडेंगे नही असे म्हणून त्यांच्यापैकी एकाने हातातील बाटलीने फिर्यादीचे अंगावर पेट्रोल टाकून व दुसर्‍या व्यक्तीने त्याच्या हातातील आगपेटीने काडी ( आग ) लावून दिली . पेट्रोल टाकणारे व आग लावणारे कोण होते याबाबत बुल्या वळवी यांना विचारले असता बुल्या वळवी यांनी सांगितले की त्यातील एका इसमाचे केस मोठे होते व एक इसम ऊंच व बारीक होता अशी त्रोटक माहिती प्राप्त झाली होती .
दि. १२ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , सोरापाडा अक्कलकुवा येथे वृध्द् इसमास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या संशयीतांच्या वर्णनाप्रमाणे दोन्ही संशयीत आरोपी खापर ता . अक्कलकुवा येथे यात्रेत सोबत फिरत आहे.अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ आपल्या पथकांना सदरची बातमी कळवून दोन्ही संशयीत आरोपीतांना ताब्यात घेण्याबाबत सांगितले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता खापर येथील यात्रेत गेले असता यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी होती . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे आरोपीतांच्या वर्णनाशिवाय इतर कुठलीही माहिती उपलब्ध नव्हती त्यामुळे पथकाला आरोपीचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका उसाच्या रसवंतीवर दोन इसम बसलेले दिसले त्यातील एका इसमाचे केस मोठे व एक शरीराने बारीक होता . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाहून ते संशयास्पद हालचाली करत होते म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धरमदास ऊर्फ भाऊ वेड्या वळवी, रविंद्र बटन पवार दोन्ही रा . आमलीफळी खापर ता . अक्कलकुवा यांना ताब्यात घेतले. दोन्ही इसमांचे फोटो काढून जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाठवून गुन्ह्यातील फिर्यादी बुल्या वळवी यांना दाखविण्यास सांगितले असता बुल्या वळवी यांनी धरमदास व रविंद्र यांना ओळखले म्हणून दोन्ही संशयीत आरोपीतांना अक्कलकुवा पोलीस ठाण्यात  आणून विचारपुस केली असता त्यांनी सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु त्यांचेकडे सखोल विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा नकुल रा . आमलीफळी व अरुण रा . चांदपुर यांच्या मदतीने रहीमोद्दीन पिंजारी रा . आमलीफळी यांच्या सांगण्यावरुन केल्याचे सांगितले . रहिमोद्दीनचा शोध घेतला असता तो गुजरात राज्यात गेल्याचे समजुन आले होते . म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि  संदीप पाटील व ४ अमंलदार यांचे पथक तात्काळ रहिमोद्दीनच्या मागावर रवाना करण्यात आले . स्थानिक गुन्हे शाखेने नकुल याची आमलीफळी येथे जावून माहिती घेतली असता नकुल व अरूण दोन्ही नकुलच्या शेतात लपून बसले असल्याची माहिती मिळाली म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३ कि.मी. पायपीट करत नकुलचे शेत गाठले व अतिशय सावधपणे नकुलच्या शेताच्या आजुबाजुला सापळा रचला . परंतु पोलीस आल्याची चाहूल लागताच नकुल व अरुण दोन्ही पळु लागले परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने दोन्ही संशयीत आरोपी नकुल ऊर्फ गटुर अशोक वसावे आमलीफळी खापर ता . अक्कलकुवा, अरुण शांताराम वसावे रा . चांदपुर ता . अक्कलकुवा यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील चार आरोपी ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले होते परंतु अजुनही मुख्य आरोपी रहिमोद्दीन पोलीसांच्या हातात लागलेला नव्हता . रहिमोद्दीनच्या मागावर असलेल्या पथकाने केवडिया ता . नर्मदा गुजरात येथून रहिमोद्दीन जलालोद्दीन पिंजारी रा . आमलीफळी खापर ता . अक्कलकुवा याला ताब्यात घेतले.  रहिमोद्दीन यास अक्कलकुवा पोलीस ठाण्यातआणून विचारपुस केली असता रहिमोद्दीने सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु धरमदास वळवी, रविंद्र पवार, नकुल वसावे,अरुण वसावे यांना समोर आणताच रहिमोद्दीनचा चेहरा पडला व आपण पोलीसांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलो गेले असल्याचे समजताच त्याने गुन्ह्याबाबत संपूर्ण माहिती दिली . त्यास गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता रहिमोद्दीन याने अतिशय धक्कादायक अशी माहिती सांगितली की , त्याचे आमलीफळी येथील एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते व बुल्या वळवी याच्या मुलाने तिला १५ दिवसापूर्वी पळवून नेले होते याचा राग मनात ठेवून रहिमोद्दीने धरमदास वळवी, रविंद्र पवार, नकुल वसावे,  अरुण वसावे यांना सांगून बुल्या वळवी यास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यास सांगितले होते अशी हकिगत सांगितली . ताब्यात घेण्यात आलेले धरमदास ऊर्फ भाऊ वेड्या वळवी, रविंद्र बटन पवार , नकुल ऊर्फ गदुर अशोक वसावे, आमलीफळी खापर, अरुण शांताराम वसावे, रहिमोद्दीन जलालोद्दीन पिंजारी यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे . स्थानिक गुन्हे शाखा व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी अतिशय क्लिष्ट व संवेदनशील अशा गुन्ह्याचा अवघ्या १२ तासात छडा लावला . सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर , अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  राजेश शिंगटे , स्थानिक गुन्हे शाखेचे सहा पोलीस निरीक्षक संदीप पाटील , असई  अनिल गोसावी , पोलीस हवालदार मुकेश तावडे , सजन वाघ , रविंद्र पाडवी , महेंद्र नगराळे , प्रमोद सोनवणे , जितेंद्र तांबोळी , राकेश वसावे , रमेश पाडवी , पोलीस नाईक मनोज नाईक , सुनिल पाडवी , विशाल नागरे , बापू बागुल , दादाभाई मासुळ , जितेंद्र ठाकुर , जितेंद्र तोरवणे , मोहन ढमढेरे , विकास कापुरे , पोलीस शिपाई विजय ढिवरे , शोएब शेख , राजेंद्र काटके , अभिमन्यु गावीत , किरण मोरे , दिपक न्हावी , रमेश साळुंके व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक राजेश गावीत , पोलीस उप निरीक्षक  ज्ञानेश्वर बडगुजर , रितेश राऊत , महिला पोलीस उपनिरीक्षक अंकिता बावीस्कर , पोलीस हवालदार कपिल बोरसे पोलीस नाईक किशोर वळवी , खुशाल माळी , पोलीस अमंलदार गिरीष सांगळे , आदीनाथ गोसावी , प्रदीप वाघ यांच्या पथकाने केली आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

पाडळदा येथील वल्लभ विद्या मंदिरात शालेय विद्यार्थ्यांना निरोप

Next Post

भाजपा आक्रमक : नंदूरबार येथे भाजपातर्फे नोटिस होळी आंदोलन

Next Post
भाजपा आक्रमक : नंदूरबार येथे भाजपातर्फे नोटिस होळी आंदोलन

भाजपा आक्रमक : नंदूरबार येथे भाजपातर्फे नोटिस होळी आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add