म्हसावद l प्रतिनिधी
नंदूरबार ओबीसी सेलच्या महिला जिल्हाध्यक्षा अनामिका चौधरी यांना पुणे येथे कस्तुरी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले . अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांचा हस्ते पुरस्कार देण्यात आला .
जागतिक महिला दिनानिमित्त अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी-पुणे येथे खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंचने आयोजित ‘ नऊवारी शान महाराष्ट्राची ‘ या व्हिडीयो अल्बम गीतचे प्रसारण सोहळा आणि राज्यस्तरीय “कस्तुरी गौरव पुरस्कार २०२२ चे मोठ्या दिमाखात उदघाट्न सोहळा सर्व दिग्गजांच्या उपस्थित पार पडला . या प्रसंगी उद्योजक सुगत वाघमारे , अखिल भारतीय मराठी चित्रपट महा . मंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले , हास्यजत्रा फेम अभिनेते पंढरीनाथ कांबळे , शांताबाई फेम अभिनेत्री राधिका पाटील , उद्योजक ,सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील , खान्देश सुपरस्टार सचिन कुमावत , निर्माते गोकुळ पाटील , संगितकार प्रमोद चिल्लाळ , निर्माते डॉ.राहुल पाटील , मॉडल -गृमिंग ट्रेनर मृणाल गायकवाड , युवाध्यक्षः खा.अ. कस्तुरी मंच महा.राज्य लेफ्ट डॉ . जितेंद्र देसले , आयोजक विजया सुरेश मानमोडे , आदी मान्यवर उपस्थित होते.