नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील घोटाणे येथून चोरट्याने मोबाईलसह दुचाकी लंपास केली.याप्रकरणी नंदूरबार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील तुळशिराम दगा पाटील यांच्या घराच्या मागे असलेल्या अंगणातून चोरट्याने ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एके २३७८) व ३ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरुन नेला. याबाबत तुळशिराम पाटील यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.मजोन चव्हाण करीत आहेत.