Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे ई – चलन रद्द करणे तसेच वाहन सोडण्याच्या प्रकरणात १० दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे महत्वपूर्ण आदेश

team by team
March 9, 2022
in क्राईम
0
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे ई – चलन रद्द करणे तसेच वाहन सोडण्याच्या  प्रकरणात १० दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे महत्वपूर्ण आदेश

नंदूरबार l प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे ई – चलन रद्द करणे तसेच वाहन सोडण्याच्या संदर्भीय प्रकरणात १० दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे महत्वपूर्ण आदेश देण्यात आला आहे.
याचिकाकर्ता शछत्रराम भलाराम जाट, रा. चोहटन, जिल्हा बाडमेर, राजस्थान, यांनी प्रतिवादी प्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार व माननीय निरीक्षक वाहन वाहतूक बॉर्डर चेक पोस्ट, नवापूर, यांच्या विरुद्ध इ – चलन रद्द करणे तसेच वाहन सोडण्याच्या संदर्भात अर्जावर निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड. गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्या मार्फत रिट याचिका क्रमांक १४७०९/२०२१ दाखल केली होती. थोडक्यात माहिती अशी की, याचिकाकर्तो यांनी ओडिसा राज्यातून मालाचा ट्रक भरलेला होता.‌ दि.२ डिसेंबर २०२१ रोजी जिंदल स्टेनलेस लिमिटेड कंपनीने एकूण किलोग्रॅम वजन ची पावती दिली होती. दि.८ डिसेंबर २०२१ रोजी सदभाव महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड, शिरपूर यांनी सुद्धा एकूण किलोग्रॅम वजन ची पावती दिली. परंतु दि.१२ डिसेंबर २०२१ रोजी सदभाव महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमितटेड, नवापूर यांनी वाहनांची क्षमता शासन निर्णयाप्रमाणे न तपासता तसेच पूर्वी दिलेल्या पावतीची खातरजमा न करता, विचारात न घेता एकूण किलोग्राम वजन जास्त ची पावती देऊन इ – चलन भरण्यासाठी पावती दिली होती. तसेच ई – चलन सुद्धा कायदेशीर तरतुदीच्या अवलंब न करता देण्यात आली होती व ट्रक सुद्धा जप्त करण्यात आला होता. म्हणून याचिकाकर्ते यांनी सदर अन्यायाविरुद्ध प्रतिवादी प्राधिकारी यांना दि.१४ डिसेंबर २०२१रोजी अर्ज सादर केला होता. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दि.२२ डिसेंबर २०२१ च्या आदेशान्वये ( न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. जी. दिघे ) यांनी सदर प्रकरणात दहा दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे आदेश पारित केले होते. परंतु सदर आदेशाचे पालन न केल्यामुळे याचिकाकर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक ९६/२०२२ दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एस. वी. गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. जी. दिघे) यांनी दि. ३ मार्च २०२२ रोजीच्या आदेशान्वये याचिकाकर्ते यांना सुनावणीची संधी देऊन १० दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले. याचिकाकर्ते तर्फे ॲड. गजेंद्र देवीचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.

बातमी शेअर करा
Previous Post

थकबाकी न भरणाऱ्या कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा होणार खंडित

Next Post

खासदार डॉ.हिना गावित यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शहादा तालुक्यात दिल्या भेटी, लवकर पंचनामे करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add