Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खासदार डॉ.हिना गावित यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शहादा तालुक्यात दिल्या भेटी, लवकर पंचनामे करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन

team by team
March 9, 2022
in कृषी
0
खासदार डॉ.हिना गावित यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शहादा तालुक्यात दिल्या भेटी, लवकर पंचनामे करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन

शहादा l प्रतिनिधी
सोमवारी संध्याकाळी शहादा तालुक्यातील
जयनगरसह परिसरात वादळी वारा, गारपीटसह पाऊस झाला होता. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी खा.डॉ.हीना गावित यांनी जयनगर आणि कोंढावळ येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच बळीराजाचे दुःख जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला.
बेमोसमी पावसामुळे जयनगरसह परिसरातील कोंढावळ, निंभोरे, बोराळे, मातकुट, वडाळी, खैरवे, भाडगाव, बामखेडा, काकरदा, तोरखेडा गावांमध्ये रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काल महसूल विभाग व कृषी विभागातर्फे प्राथमिक पाहणी करण्यात आली होती. आज प्रत्यक्ष खा. डॉ हिना गावित यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी लवकरच पाठपुरावा केला जाईल, असे खासदार गावित यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला.
यावेळी खा. डॉ हिना गावित यांच्यासोबत तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी, तालुका गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे , तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे, नंदूरबार भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील, महात्मा फुले युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी, कृषी सहाय्यक सुकन्या निकम, मंडळ अधिकारी विजय साळवे, तलाठी किशोर जाधव, ग्रामसेविका आरती पाटील, उपसरपंच सुनील माळी, व शेतकरी उपस्थित होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लवकर पिक पाहणी लावावी-
मागील वर्षापासून शेतकऱ्यांनी स्वतः पिक पाहणी करायची आहे. त्यानुसार रब्बी हंगामातही महसूल विभागातर्फे वेळोवेळी सूचना देऊनही अनेक शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली नाहीये. म्हणून ज्या शेतकऱ्यांचे बेमोसमी पावसात नुकसान झाले आहे. त्यांनी लवकरात – लवकर पीक पाहणी लावावी, जेणेकरून पंचनामा झालेल्या शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरतील.

बातमी शेअर करा
Previous Post

मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे ई – चलन रद्द करणे तसेच वाहन सोडण्याच्या प्रकरणात १० दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे महत्वपूर्ण आदेश

Next Post

रनाळे येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे फलक अनावरण व मार्गदर्शन शिबिर

Next Post
रनाळे येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे फलक अनावरण व मार्गदर्शन शिबिर

रनाळे येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे फलक अनावरण व मार्गदर्शन शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add