म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथे जायंट्स ग्रुप व जगदीश हॉस्पिटल शहादा यांच्या संयुक्त विद्यमान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरासाठी नाशिक येथील आकार हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.किरण नेरकर होते. सर्व प्रथम आयुर्वेदाचे आराध्यदैवत धन्वंतरीची पुजन करुन शिबिराला प्रारंभ करण्यात आला.
या नंतर आलेल्या रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले व गरजू रुग्णांची अल्पदरात सर्जरी करण्यात आली. .यावेळी जगदीश हॉस्पिटलचे डॉ. विवेक पाटील यांचे सहकार्य लाभले. या वेळी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, सहेली अध्यक्षा दिपाली बाविस्कर, डॉ स्मिता जैन,डॉ सुभाष पाटील ,माणक चौधरी,कैलास भावसार,के.के.सोनार,माधव पाटील,सुरेश चव्हाण,इस्माईल राजा,दिलीप पाटील,प्रो.नगिन पाटील आदी उपस्थित होते. शिबीर यशस्वीतेसाठी जायन्ट्स ग्रुपचे सदस्य व जगदीश हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतली.