नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबारच्या पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी हे जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्याना सहकार्य न करता.त्यांनी जिल्ह्यातील शिवसैनीकांशी संघर्ष करण्यापेक्षा जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करावा त्यांना आम्हीही साथ देवु अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे नेते राज्यसभा खा.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेचे नेते तथा खासदार खा.संजय राऊत नंदुरबार जिल्हा दौर्यावर आले आहेत.त्याप्रसंगी नंदुरबार येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी ते बोलत होते.पुढे श्री.राऊत यांनी सांगीतले कि, नंदुरबार येथे जिल्ह्यातील शिवसैनिकांची आढावा बैबक घेण्यात आली.यात अनेकांनी आघाडीत असलेले नंदुरबारचे पालकमंत्री ऍड.के.सी.पाडवी हे जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्याना सहकार्य करत नसल्याची तक्रार केली ऍड.के.सी.पाडवी यांनी शिवसैनीकांशी संघर्ष करण्यापेक्षा जिल्ह्यातील नागरीकांच्या समस्यांबाबत शासनानाशी संघषग् करावा सासाठी आम्हीही मदत करू असे सांगत. आगामी काळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवींना यांना आमदार बनवणारच असा निश्चय बोलुन दाखवला.त्याच बरोबर शहादा,आगामी काळात साक्री,शिरपूरच्या पालिकेच्या निवढणुकांमध्ये आघाडी करायची की नाही यासाठी स्थानीक पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले यावेळी कृषिमंत्री दादा भुसे, संपर्कमंत्री बबनराव थोरात.आ.मंजुळा गावित, शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी आदी अपस्थीत होते.