नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य इतर मागासगर्वीय वित्त व विकास महामंडळामार्फत लघुउद्योग व व्यवसायाकरीता कर्ज पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.
सन २०२१-२०२२ वर्षांकरीता नंदुरबार जिल्ह्याकरीता २० टक्के बीज भांडवल योजना व रुपये १ लक्ष पर्यंत थेट कर्ज योजना तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजनांचा समावेश आहे. रुपये १ लक्ष थेट कर्ज योजनेकरीता अर्जदाराचा सिबिल क्रेडीट स्कोर हा किमान ५०० असणे आवश्यक असून योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या msobcfdc.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागसवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक ०२५६४-२१००६२ ) वर संपर्क साधावा असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.