Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पानिपत हे पराभवाचे नाही तर पराक्रमाचे विशेषण : सिनेअभिनेते योगेश सोमण

team by team
February 12, 2022
in राज्य
0
पानिपत हे पराभवाचे नाही तर पराक्रमाचे विशेषण : सिनेअभिनेते योगेश सोमण

नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हेच भारतीयत्व आहे.याचसोबत पानिपत हे पराभवाचे नाही तर पराक्रमाचे विशेषण आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेते योगेश सोमण यांनी नंदुरबार येथे अभाविप चे ५६ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला उत्साहात उद्घाटन केले.
अभाविपच्या ५६ व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनाला बाल हुतात्मा शिरिष कुमार नगरी, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार येथे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चौहान यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला यावेळी व्यासपीठावर सिनेअभिनेते योगेश सोमण, अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, स्वागत समिती अध्यक्ष सौ. ईला गावित,पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भय विसपुते, प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. सारंग जोशी प्रदेश मंत्री कु. अंकिता पवार, शहर मंत्री जयेश सोनवणे उपस्थित होते.
अधिवेशनाचे स्वागत समिती अध्यक्ष सौ. ईलाताई गावित यांनी स्वागत पर मनोगत व्यक्त केले.देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. सारंग जोशी यांनी सर्वांसमोर विद्यार्थी परिषदेची मांडणी केली. समाजात उभारलेले प्रश्न, परिषदेने केलेला संघर्ष, त्यात येणाऱ्या अडचणी, मिळणारे अनुभव अशा विविध विषयांवर प्रा. सारंग जोशी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध सिने अभिनेते योगेश सोमण यांनी त्यांच्या भाषणात काही ऐतीहासीक गोष्टींवर उजाळा देण्याचे काम केले. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हेच भारतीयत्व, याचसोबत पानिपत हे पराभवाचे नाही तर पराक्रमाचे विशेषण आहे अशा अनेक विशेष बाबी त्यांनी मांडल्या. कार्यकर्ता कसा हवा? या वर अतिशय सुंदर स्पष्टीकरण यांनी यावेळी केले. सोशल मीडिया कडे आपण कशाप्रकारे लक्ष देऊन वापर करायला हवा, या चे उदाहरण त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. तसेच, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इत्यादी विविध क्षेत्रात कसे कार्यरत राहिले पाहिजे याविषयात सर्वांना मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांनी विद्यार्थी परिषदेच्या आजतागायत च्या विविध कार्याचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. परिषदेचे विविध आयाम, मागील वर्षांत केलेल्या कार्यांचा अहवाल, आणि आगामी काळात करण्यात येणाऱ्या कार्यांवर आशिष जीं नी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चौहान यांनी त्यांचे विद्यार्थी परिषदेसोबत चे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी जनजाती बांधवांचा गौरवशाली इतिहास आणि नव्याने घोषित झालेल्या जनजाती गौरव दिनासाठी विद्यार्थी परिषदेने घेतलेला पुढाकार यासाठी अभिनंदन केले. विद्यार्थी कसा असावा याचे मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना केले. उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन स्वागत समिती सचिव संतोष पाटील तसेच आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष डॉ. गिरीश महाजन यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

पानबारा शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतुन २१ लॅपटॉप लंपास,पोलीसांनी पाहणी करीत श्‍वास पथकास केले पाचारण

Next Post

गुजरात राज्यात विक्रीला जाणाऱ्या पांच लाखाच्या तांदूळसह चौदा लाखाचा मुद्देमाल जप्त ,नंदुरबार तालुका पुरवठा निरीक्षकांची कारवाई

Next Post
पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

गुजरात राज्यात विक्रीला जाणाऱ्या पांच लाखाच्या तांदूळसह चौदा लाखाचा मुद्देमाल जप्त ,नंदुरबार तालुका पुरवठा निरीक्षकांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add