नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील स्थानिक आमदार निधीतुन विविध विकास कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आ. शिरीषकुमार नाईक यांच्या स्थानिक आमदार निधीतून नंदुरबार तालुक्यातील राजापुर, गुजर भवाली,वेळावड येथे सभामंडप,शिवपूर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व देवमोगरा माता मंदिराचे भूमीपूजन,व्याहूर येथे मुख्य चौकात पेव्हर ब्लॉक बसविणे,धुळवद येथे सभामंडप भूमिपुजन व धुळवद- व्याहूर रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, शिवसैनिक धर्मेंद्र परदेशी,पं.स सदस्य तेजमल पवार, शिवपुरचे सरपंच सुधीर पाडवी,उपसरपंच रविदास वसावे,सलमा वळवी,वत्सलाबाई पाडवी,किर्ती वळवी,अमोल वळवी, रसिला वळवी,धुळवडचे सरपंच किसन वळवी, किसन ठाकरे, भिमसिंग वळवी,रमेश ठाकरे,कृष्णा ठाकरे, सुरेश पाडवी, गणेश वळवी, वेळावदचे रामसिंग वळवी,जगन वळवी,ईश्वर वळवी,जेश्मा वळवी, शेगा वळवी व ग्रामस्थ उपस्थित होते.










