Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांविषयीच्या कामकाजाबद्दल नंदूरबार पोलीस दलाचे केले कौतुक

team by team
February 11, 2022
in क्राईम
0
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांविषयीच्या कामकाजाबद्दल नंदूरबार पोलीस दलाचे केले कौतुक

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नंदुरबार जिल्हा भेटी दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट देवून महिला संबंधी दाखल गुन्ह्यांचा तसेच जिल्हा पोलीस दलाकडून महिलांशी निगडीत कामकाजाचा आढावा घेत महिलांविषयीच्या कामकाजाबद्दल नंदुरबार पोलीस दलाचे कौतुक केले
नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथील जनसुनावणी कार्यक्रम संपवून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयास भेट दिली.यावेळी यांच्या समवेत आयोगातील सदस्य सचिव श्रीमती श्रध्दा जोशी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी स्वागत केले.
यावेळी रुपाली चाकणकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत महिला सहायता कक्ष तसेच नियंत्रण कक्षास भेट देवून तेथे चालत असलेल्या कामकाजाविषयी माहिती घेतली. त्यानंतर नंदुरबार शहरातील पोलीस अधिकारी तसेच इतर निमंत्रितांकरीता पोलीस अधीक्षक कार्यालयातील संवाद हॉल येथे आयोजीत कार्यक्रमात त्या उपस्थित राहिल्या. यावेळी श्रीमती रुपाली चाकणकर यांनी महिलांविरुध्द् दाखल गुन्ह्यांचा तसेच हरविलेल्या महिला व मुली यांच्या मिसिंग प्रकरणांचा आढावा घेतला. महिलांविरूध्द् दाखल गुन्ह्यात पोलीस दलाकडून तात्काळ करण्यात आलेली कारवाई तसेच मिसिंग महिला व मुली मिळून येण्याच्या प्रमाणाबद्दल रुपाली चाकणकर यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मनोधैर्य योजनेंतर्गत बलात्काराच्या गुन्ह्यातील अत्याचाराग्रस्त पिडीतेस तात्काळ लाभ मिळवून देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
कौटुंबीक वादाच्या प्रकरणांत महिला सहायता कक्ष, नंदुरबार यांच्याकडून समझोता घडवून आणण्यात आलेल्या पलक विकी थाराणी रा. नंदुरबार, गीता संदीप पाटील रा. सातुर्खे ता.जि. नंदुरबार, सोनाली सुबोध जावरे रा. नंदुरबार, रामी गणपत गावीत रा. विसरवाडी यांचा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच स्वबळावर व्यावसाय करणार्‍या महिला श्रध्दा भेलांडे रा.नंदुरबार,आरती चौधरी रा. नंदुरबार, गायत्री समाधान कोळी रा. नंदुरबार यांचाही पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.


नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव, मोलगी, शहादा, येथील कौटुंबीक हिंसाचाराने ग्रस्त महिलांना जिल्हा स्तरावर येवून तक्रार देणे सोयीचे होत नसल्याने जिल्हा स्तरावर कार्यरत महिला सहायता कक्षाव्यतिरिक्त तालुका स्तरावर नंदुरबार जिल्हा पोलीस दल तसेच जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरावरील पोलीस ठाण्यांमध्ये महिला सहायता कक्ष स्थापन करणेबाबत नियोजीत प्रस्तावाचे श्रीमती रुपाली चाकणकर यांनी कौतूक केले. त्यानूसार नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात नंदुरबार शहर, नंदुरबार तालुका, नवापुर व शहादा येथील पोलीस ठाण्यात महिला सहायता कक्ष सुरु करण्यात येणार आहे. सुकाणू समिती,आयुक्त कार्यालय, महिला व बालविकास विभाग, पुणे यांचेकडून परवानगी मिळताच सदरचे कक्ष सुरु करण्यात येणार आहेत. सदर कक्षाकरीता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरचे समूपदेशन केंद्र आगामी काळात सुरु करण्यात येणार आहे.
कायदेशीर कर्तव्या व्यतिरिक्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी कामाबद्दल श्रीमती. रुपाली चाकणकर यांनी पोलीस दलाचा गौरव केला. पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून नंदुरबार शहरातील माळीवाडा येथील विधवा महिला उज्वला चिंधा माळी यांना नाममात्र दरात जिल्हा पोलीस दलाच्या मालकीचा गाळा उपलब्ध करून देण्यात आला. त्यात त्यांनी सुरु केलेल्या कल्याणी व्हेजिटेबल्स या दुकानाचे श्रीमती. रुपाली चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालय भेटी दरम्यान घेण्यात आलेल्या आढाव्याबाबत राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर व सदस्य सचिव श्रीमती श्रध्दा जोशी यांनी नंदुरबार पोलीस दलाच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करून कामाविषयीचे कौतुक केले. तसेच नंदुरबार पोलीस दल महिलांविषयीचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे त्याची प्रशंसा करून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांनी देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दलासारखे उपक्रम राबवावे अशी अशा व्यक्त केली. त्याप्रसंगी नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रविंद्र कळमकर, पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, वाचक पोलीस निरीक्षक अर्जुन पटले,पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा भरत जाधव, सहा. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संदीप पाटील हे उपस्थित होते. महिला सहायता कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक नयना देवरे, असई भगवान धात्रक, महिला पोलीस हवालदार प्रमिला वळवी, प्रिती गावीत, महिला पोलीस शिपाई अरूणा मावची यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या ५६ व्या अधिवेशनास ध्वजारोहण करून प्रारंभ

Next Post

स्थानिक आमदार निधीतून जि.प उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post
स्थानिक आमदार निधीतून जि.प उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

स्थानिक आमदार निधीतून जि.प उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add