Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात जलजिवन मिशनचा कामाला सुरुवात; वसलाईत जि.प अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

team by team
February 3, 2022
in आरोग्य
0
जिल्ह्यात जलजिवन मिशनचा  कामाला सुरुवात; वसलाईत जि.प अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. वसलाई ता. नंदुरबार येथे जलकुंभाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले. पाण्यामुळे नागरिकांचे बरेचसे प्रश्न सुटत असल्याने शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथे गुरुवारी दुपारी जलजिवन मिशन अंतर्गत पिण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी म्हणाल्या, जल जीवन मिशन योजनेत केंद्र व राज्याच्या 50 टक्के वाटा आहे. नागरिकांचे पाण्याचे प्रश्न सुटावेत यासाठी शासनाची अत्यंत चांगली योजना आहे. पाण्यामुळे सर्वाधिक हाल महिलांचे होत असतात. गावात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असते. परंतु, आता जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या त्यांच्या घरा पर्यंत पाणी पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जि.प उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी म्हणाले, वसलाई गावाला कधीही पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जलजिवन मिशन अंतर्गत 35 लाखाच्या पाण्याच्या टाकीला मंजुरी देण्यात आली. गावातील नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा असतील त्या पूर्ण करण्याच्या प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमप्रसंगी प्रसंगी पं.स उपसभापती कमलेश महाले, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, माजी बांधकाम सभापती विक्रमसिंग वळवी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे,पं.स सदस्य तेजमल पवार,धर्मेंद्र परदेशी, सरपंच श्रीमती आशा वळवी, माजी सरपंच मंगलसिंग वळवी, उपसरपंच मांगीलाल वळवी,ग्रा.पं सदस्य दयाराम वळवी, श्रीमती आवशी वळवी, जितेंद्र वळवी,भांगडाचे सरपंच पुरुषोत्तम वसावे,उपसरपंच अमृत वसावे, चंपालाल महाराज, विश्राम वळवी, महेश वळवी,निखील वळवी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

‘हर घर नल, नलसे जल’ मिळवण्यासाठी लोकसहभाग व लोकवर्गणी भरणे महत्वाचे

Next Post

शिवसेना जिल्हाप्रमुख व उपतालुका प्रमुख यांच्या पाठपुराव्यास यश

Next Post
शिवसेना जिल्हाप्रमुख व उपतालुका प्रमुख यांच्या पाठपुराव्यास यश

शिवसेना जिल्हाप्रमुख व उपतालुका प्रमुख यांच्या पाठपुराव्यास यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add