Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘हर घर नल, नलसे जल’ मिळवण्यासाठी लोकसहभाग व लोकवर्गणी भरणे महत्वाचे

team by team
February 3, 2022
in आरोग्य
0
‘हर घर नल, नलसे जल’ मिळवण्यासाठी लोकसहभाग व लोकवर्गणी भरणे महत्वाचे

नवापूर l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनांच्या औचित्यावर देशाला संबोधित करताना घोषणा केली आहे की २०२४ पर्यंत हर घर नळ,नळ से जल देऊन पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठीची भटकंती थांबवून देश टँकर मुक्त करण्यासाठी जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल, नलसे जल मिळवण्यासाठी लोकसहभाग व लोकवर्गणी भरणे महत्वाचे आहे.असे प्रतिपादन कार्डचे सचिव पुष्कराज तायडे यांनी नानगीपाडा (ता.नवापूर) येथे आयोजित सभेत केले.
जल जीवन मिशन (ग्रामीण) अंतर्गत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्ड अंमलबजावणी सहाय्य संस्था चे वरिष्ठ समाज शास्त्रज्ञा दर्शना वसावे,सरपंच यशवंत गावित, उपसरपंच सुनील गावित,ग्रामसेवक चंद्रशेखर सुर्वे, अनिल गावित, अंगणवाडी सेविका जयवंती वळवी तर बचत गटाच्या महिला व जलसुरक्षा रक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष महाराष्ट्र शासन मुंबईकडुन कार्डची आदिवासी भागातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासाठी निवड करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यातील ४० गांवात जल जीवन मिशन अंतर्गत सेंटर फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (CARD) जालना ही अंमलबजावणी सहाय्य संस्था (ISA) म्हणून १५ जुलै २०२१ पासून कार्यरत आहे. जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे (भाप्रसे), प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ.वर्षा फडोळ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर, गट विकास अधिकारी चंद्रकांत माळी, उपअभियंता विशाल कांबळे, कार्डचे अध्यक्ष प्रा सुवर्णा दांडगे, उपाध्यक्ष प्रा.डॉ.रामदास निहाळ, सचिव पुष्कराज तायडे, कोषाध्यक्ष सोनिया तेलगड, सहसचिव रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शना वसावे वरीष्ठ समाजशास्त्रज्ञ, इंजि.रूपेश खरात स्थापत्य अभियंता म्हणून कार्य करीत आहेत.
जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीसाठी कार्ड टीम ग्रामपंचायत व ग्रामसभेत ग्रामीण पाणी पुरवठा समिती स्थापन करून त्यांचे बँकेत खाते उघडने, गांवाच्या लोकसंख्याच्या प्रमाणात पिण्यासाठी व वापरासाठी लागणारे पाणी याचे अंदाजपत्रक मांडून, ग्रामीण लोकसभागीय मूल्याकन करून पाणीपुरवठा करण्यासाठीचे भौतिक व आर्थिक बजेट, गांव कृती आराखडा तयार करून त्यास ग्रामसभेत मंजुरी घेऊन लोकसहभागातून गावकरी कामे करणे, शेवटच्या कुटुंबापर्यंत पाणी पुरवठा पोहचवण्यासाठी कोपरा, वार्ड बैठका, गृहभेटीतुन भरावी लागणारी पाणीपट्टी, लोकवर्गणी आदी बाबतीत मार्गदर्शन व वेळोवेळी क्षमता बांधणी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पाणी व स्वच्छतेच्या कामात सुधारणा करावी अन्यथा संबंधीतावर कडक कारवाई केली जाईल : मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Next Post

जिल्ह्यात जलजिवन मिशनचा कामाला सुरुवात; वसलाईत जि.प अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post
जिल्ह्यात जलजिवन मिशनचा  कामाला सुरुवात; वसलाईत जि.प अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

जिल्ह्यात जलजिवन मिशनचा कामाला सुरुवात; वसलाईत जि.प अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add