म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद गावातील जि.प.शाळा अनकवाडे म्हसावद येथील मुख्याध्यापिका कलावती रत्तु पाडवी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा म्हसावद केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला.
कलावती पाडवी यांनी लक्कडकोट, म्हसावद, मेंढवड ता. तळोदा, राणीपूर, अनकवाडे येथे नोकरी केली असून कलावती पाडवी यांनी एकुण ३६ वर्षे सेवा बजावली.कार्यक्रमास माजी उपसंचालक बी.ई. वसावे औरंगाबाद, गटशिक्षणाधिकारी उषाताई पेंढारकर, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एस. तावडे, केंद्रप्रमुख पी. आय. चव्हाण, प्राचार्य सुरेखा गुजर, शिक्षक महेंद्र बैसाणे, पदोन्नती मुख्याध्यापक भिला निळे, मुख्याध्यापक रविंद्र बैसाणे उपस्थित होते. यावेळी माध्यमिक शिक्षिका कंचन निकुंभ, पुष्पा बाविस्कर, रुकसाना अन्सारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रविंद्र बैसाणे यांनी मानले.