रासायनिक खता ऐवजी सेंद्रिय खताचा वापर करून जास्तीत जास्त भाजीपाला व इतर पिकांचे उत्पादन करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. सिमा वळवी यांनी खरवड ग्रामपंचायती मार्फत विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले त्यावेळी अँड. सिमा वळवी यांनी सांगितले.
प्रामुख्याने जिल्हा ग्राम विकास निधीतून जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत खरवड ग्रामपंचायतील ६ व्यापारी गाळ्यांचे उद्घाटन व शासकीय इमारतीचे वॉल कंपाऊंडचे उद्घाटन १५ व्यां वित्त आयोगातून बोरवेल, नव्या अंगणवाडीच्या इमारतीचे उद्घाटन, फ्लेवर ब्लॉक बसविणे, वृक्षारोपण आदी कामांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्या पार्वतीबाई दामु गावीत, माजी समाज कल्याण सभापती नरहर ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर पवार, माजी जि.प.सदस्य जितेंद्र पाडवी, माजी पंचायत समिती सदस्य सिताराम राहसे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रविण वळवी, संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्या निशा वळवी, सचिन राहसे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा हस्ते देवमोगरा मातेचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर उपस्थित पाहुणे जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. सिमा वळवी, निशा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी समाज कल्याण सभापती नरहर ठाकरे, दिवाकर पवार, जितेंद्र पाडवी, जिल्हा परिषद सदस्य पार्वतीबाई गावीत, सिताराम राहसे, पत्रकार मंगेश पाटील यांचा सत्कार सरपंच ईजाबाई मोरे, वंदनाबाई गोसावी, बबन भारती, प्रल्हाद भारती, संतोष माळी, सुरेश भिल, रेखाबाई शिरसाठ, प्रमिला पाडवी, साक्षी गोसावी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामसेवक प्रकाश कोळी यांनी केले. तर सूत्रसंचालन साक्षी गोसावी यांनी केले. तसेच उपस्थितीतांचे आभार शाखा अभियंता दिलीप गोसावी यांनी मानले.
खरवड येथील १० महिला बचत गटातील महिलांना सुबाबुळ, निलगिरी, बांबू आदी रोगांचे वाटप व भाजीपाला बियाणांचे वाटप करण्यात आले. तर शेतकऱ्यांना झाडांचे रोपांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जि.प.अध्यक्ष अँड.सिमा वळवी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, खरवड ग्रामपंचायतीचे कामांचे कौतुक करुन तालुक्यातील पंचायतीनी खरवड गावाचा आदर्श घ्यावा असे आवाहन करुन महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. भाजीपालाचे जास्तीत जास्त उत्पादन करण्यासाठी रासायनिक खता ऐवजी सेंद्रीय खताचा जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त उत्पादन करून महिला बघत गटांनी स्वांवलबी व्हावे. तसेच पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे व सातपुडा पूर्णपणे बोडका झाला आहे. त्यामुळे जुलै महिना उजाडला तरी पाऊस साजेसा पाऊस झाला नाही. त्यासाठी वृक्षारोपण होते गरजेचे आहे. तळोदा तालुक्यात २५ लाख वृक्षांची लागवडांचे उदिष्ट आहे. ते पूर्ण करून वृक्ष लावणे हे महत्त्वाचे नसून झाडे जगविणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर, घराच्या अंगणात झाडे लावून झाडे जगवा असे आवाहन केले. यावेळी अँड.पद्माकर वळवी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन माजी पं.स. उपसभापती नंदुगीर गोसावी यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. कोवीड-१९ चा तंतोतंत पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, ग्रा.प.सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.