नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील रनाळा ते घोटाणे दरम्यान मोटरसायकल घसरून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील रनाळे ते घोटाणे रस्त्या दरम्यान भिका गंगाराम पाटील (६६) रा.कार्ली (ता.नंदुरबार) हे त्यांची मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-पी.५६८१) हि विनापास परमीटशिवाय भरधाव वेगाने जात असतांना त्यांच्या वाहनावरील ताबा सुटल्याने मोटरसायकल घसरली. त्यात ते रस्त्यावर पडल्याने डोक्याला दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तुकाराम भिका पाटील रा.कार्ली (ता.नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८, ४२७ मोटरवाहन कायदा कलम १४४ (३) ३ (१) १८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ गुरव करीत आहेत.