Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे श्री स्वामी समर्थ केन्द्रातर्फे प्रत्यक्ष बांधावर सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यशाळा

team by team
January 29, 2022
in राज्य
0
नंदुरबार येथे श्री स्वामी समर्थ केन्द्रातर्फे प्रत्यक्ष बांधावर सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यशाळा

नंदुरबार | प्रतिनिधी
जीवन जगण्यासाठी सकस व पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे.त्यासाठी सेंद्रिय व जैविक शेती करणे ही काळाची गरज आहे यासाठी कृषी विभागात कार्य करणारे अधिकारी व शेतकरी यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे यासाठी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी सेवेकरींची कार्यशाळा श्री. स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास मार्ग व कृषी संशोधन केंद्र दिंडोरी प्रणित गुरुपुत्र  आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक व कृषी संशोधन प्रशिक्षण केंद्र,चौपाळे रोड,नंदुरबार येथे दिंडोरी प्रतिनिधी सेवेकरी सचिन माने,पांडुरंग हटकर,आनंद काळे व नंदुरबार जिल्हा केंद्र प्रतिनिधी जीवन देवरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेतील मार्गदर्शनात सेंद्रिय शेती करण्यासाठी वैदिक विज्ञान व अध्यात्माची सांगड घालून शेती केल्यास पीकामध्ये व अन्नामध्ये सात्त्विकता येत असते.कमी खर्चात होणारी शेती, सेंद्रिय शेतीचे महत्व,गांडूळ खताचे महत्व,परिसरात व पर्यावरणात उपलब्ध असलेल्या साधन सामग्री नुसार पारंपारिक पद्धतीने होणारी शेती पद्धत,जल संधारणाचं व बांधावरील झाडे यांचं महत्त्व,बाराबलुतेदार,मराठी अस्मिता,राणभाज्या,कृषी विभाग अंतर्गत शासनाच्या विविध योजना जैविक शेती व अन्न,सीड बँकआदी महत्वपूर्ण बाबींवर चर्चा करून उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.यावेळेस शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीबाबत योग्य पद्धती याविषयी अधिक माहिती व प्रत्यक्ष प्रत्यक्षिक जाणून घेतली.तसेच त्यांनी नंदुरबार येथील कृषी प्रशिक्षण प्रकल्प येथील शेंद्रीय शेतीचे प्रात्यक्षिक,विहीर,जलसिंचनाचे विविध माध्यम असे विविध उपक्रम गेल्या २००५ या सालापासून सातत्याने चालू आहे. कृषी विभागातील कार्याचा आढावा घेत श्री.स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक व कृषी संशोधन प्रशिक्षण केंद्र,नंदुरबार विभागाचे उल्लेखनीय कार्याबद्दल कौतुक करण्यात आले.
या कार्यशाळेत दिंडोरी प्रणीत मार्गाच्या माध्यमातून उत्कृष्टपणे सेंद्रिय शेती करणाऱे व सेंद्रिय शेती करण्यासाठी इच्छुक असणार्‍या सर्व शेतकर्‍यांशी चर्चा करुन संवाद साधण्यात आला.या  प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जीवन देवरे यांनी नंदुरबार येथे दिंडोरी प्रणित मार्गाच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या १८ ग्रामविभागात राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांचा लेखी अहवाल तसेच कृषी विभागाचा माध्यमातून चालणारे प्रशिक्षण व शेंद्रीय शेतीच्या माध्यमातून होणारे पीक,फळभाज्य,पालेभाज्यांची माहीती सादर केली
कोरोनाचे सर्व शासकीय नियमानुसार सामाजिक अंतर ठेवून गायीच्या गौर्या,गायीचं तुप व वेखंड पावडरचा धुर शेतकरींना देऊन,परिसरात सेंद्रिय सॅनेटाइज करुन या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.कृषी विभागाच्या आढावा बैठकीच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,नंदुरबार येथील कृषी व आरोग्य विभागातील सेवेकरींनी सहकार्य केले

बातमी शेअर करा
Previous Post

‘द बर्निंग ट्रेन’ ; अखेर गांधीधाम-पुरी एक्सप्रेस रवाना, आगीचे कारण गुलदस्त्यात

Next Post

भरधाव मोटरसायकलवरून ताबा सुटल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू

Next Post

भरधाव मोटरसायकलवरून ताबा सुटल्याने दुचाकी चालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add