तळोदा l प्रतिनिधी
शेतात काम करणार्या कुटुंबियांचा जेवणाचा डबा देऊन घरी परतणार्या १९ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी तळोदा पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करडे ता तळोदा येथिल १९ वर्षीय विवाहीता तिच्या माहेरी शेजारील मालदा या गावी अली होती.२० जानेवारी रोजी ती शेतात काम करणारे तिचे वडील,भाऊ व इतर कुटुंबीयांना दुपारचा जेवणाचा डबा देण्यासाठी मालदा शिवारातील शेतात गेली होती. शेतातून डबा देऊन दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरी परतत असतांना गावाबाहेरच्या रस्तावर उभा असणार्या मिथुन सतार्या ठाकरे याने तिचा डावा हात पकडून जबरदस्तीने शेतात खेचण्याचा प्रयत्न केला.तिने आरडाओरडा केल्यानंतर तिचा हात सोडून दिला.याबाबत कोणाला माहिती सांगितली तरी मारण्याची धमकी देखील त्याने दिली.
संध्याकाळी आई-वडील व माहेरील कुटुंबीय शेतातून काम करून घरी परतल्यानंतर सदर घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना विवाहितेने माहिती दिली.त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत तिने मोबाईलद्वारे करडे (ता तळोदा) येथील तिचे पतीला देखील या प्रकाराबाबत माहिती दिली. माहेर व सासरच्या मंडळींनी चर्चा करून आज २२ जानेवारी रोजी आरोपी मिथुन सध्या ठाकरे यांच्या विरोधात पीडित महिलेने तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मिथुन सतार्या ठाकरे याचा विरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गौतम बोराडे करत आहेत.