Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खापर शिवारात कंटेनरचा भिषण अपघातात एक जण ठार, १० गुरे दगावली,चालक फरार

team by team
January 23, 2022
in क्राईम
0
खापर शिवारात कंटेनरचा भिषण अपघातात एक जण ठार, १० गुरे दगावली,चालक फरार
अक्कलकुवा l  प्रतिनिधी
नेत्रग-शेवाळी महामार्गावर अक्कलकुवा तालुक्यातील खापर शिवारातील रामजी हॉटेल जवळ गुरांना वाहणार्‍या कंटेनरचा शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला.यात क्लिनर जागीच ठार तर चालक फरार झाल्याची घटना घडली आहे.
गुजरात राज्यामधून शनिवारी पहाटे तीन वाजता नेत्रंग  शेवाळी महामार्गाने येणार्‍या गुरांनी भरलेला कंटेनर खापर गावाजवळील हॉटेल रामजी जवळ असलेल्या झाडावर भरधाव वेगाने आदळला.त्यात क्लिनर बाजूला असलेल्या रईस अली बाबू खान नामक व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.तर चालक घटनास्थळा वरून पसार झाल्याची माहिती मिळाली.
सदर घटनेत सीलबंद कंटेनर मध्ये गुरे आढळून आली आहे.झालेल्या अपघातामुळे व गुरांची उशिरा सुटका केल्यामुळे १० गुरे दगावली तर १८ जीवंत गुरांना पोलीसाच्या हस्ते गौशाळेत पोहचाविण्यात आले. झालेल्या घटनेचा अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिरोज मोहम्मद मकसतुन यांनी दिलेल्या खबरी वरून भादवी कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८ सह मोटर वाहन कायदा कलम १८४,१८७ प्रमाणे कंटेनर क्र. आर.जे.४७.जी.ए.४७६६ वरील चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यांचा पुढील तपास पो.नी.पठाण यांच्या आदेशानुसार पो.हे.कॉ.मोहन शिरसाठ करीत आहे.
शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातातील गुरांची सीलबंद कंटेनर मधून दिवसभरात सुटका करण्यात आली नाही. राजस्थान राज्यातून आलेल्या गुरांना दोन दिवसापासून दाणा-पाणी नव्हते.सांयकाळी उशिरा पर्यंत सूटका झाली नसल्याने जिल्ह्यातील विविध संघटनांनी पोलिस अधिकार्‍यांवर नाराजी व्यक्त करीत निषेधही नोंदविलाअपघात झालेल्या कंटेनर मधील जखमी गुरांना वेळेत उपचार मिळाला असता तर अजून काही गुरं वाचली असती. पोलिस अधिकार्‍यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे काही गुरांना जीव गमवावा लागला.अशी प्रतिक्रिया विविध संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
गंभीर अपघात झाल्याने चालकासह असणारा एक व्यक्ती जागीच ठार झाला होता.झालेली घटना खापर पोलीस दुरक्षेत्राच्या अंतर्गत असल्याने चौकीतील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले,दिवसभरात कारवाई सुरू होती.उशिरा प्रयन्त काम करून रात्री नाईलाजास्तव स्थानिकांच्या मदतीने पो.हे. कॉ. शिरसाठ व कर्मचारी संजय सूर्यवंशी,निलेश वसावे,सतिष वळवी यांनी कंटेनरचे सील तोडून गुरांची सुटका केली. जिवंत असलेले काही गुरांना गाडीने व काहींना स्वता ३ कि.मी. चारत गौशाळेत पोहचवले.केलेल्या कामगीरी मुळे कर्मचार्‍याचे परिसरात कौतुक केले जात आहे.तर अधिकार्‍यावर नाराजी कायम असल्याचे दिसते.
बातमी शेअर करा
Previous Post

तोलाचापड फाट्याजवळ दुचाकी पुलावरून कोसळली, अपघातात एक जण गंभीर

Next Post

शेतातून डबा देऊन परतणार्‍या विवाहितेचा विनयभंग

Next Post

शेतातून डबा देऊन परतणार्‍या विवाहितेचा विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026
खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून होणारी प्रवाश्यांची आर्थिक लुट थांबवा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

May 8, 2026
जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान

May 8, 2026
कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोळदा-धनराट रस्त्यावर अवैध दारूसह २६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

May 8, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add