म्हसावद l प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता शासनाच्या आदेशानुसार म्हसावद ता.शहादा गावाची श्री. रिध्दी सिद्धी विनायक यात्रा रद्द करण्यात आल्याचे म्हसावद ग्रामपंचायत प्रशासनाने कळवले आहे. कोरोनामुळे सलग तिसऱ्या वर्षीही म्हसावद येथे भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
आज संकष्ट चतुर्थी पासून म्हसावद येथे भरणारी श्री.रिद्धी सिद्धी विनायक यात्रा न भरण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनातर्फे, प्रांताधिकारी,तहसिलदार, म्हसावद पोलीस स्टेशनला लेखी निवेदने देण्यात आली आहेत.गावात दवंडी देवून यात्रा बंद असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.सरपंच सौ.अक्का ठाकरे,उपसरपंच चिंतामण धनगर,पंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी बी.पी.गिरासे, यांनी संकष्ट चतुर्थी निमीत्ताने येणाऱ्या भाविकांनी कोरोनाबाबत दक्षता घेवून नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.